1. ऑटोमोबाईल

Maruti Suzuki Ertiga: 4 लाखात खरेदी करा मारुती सुझुकी एर्टिगा, प्लॅन समजून घ्या

मारुती सुझुकी एर्टिगा ही मारुती सुझुकी कंपनीची एक लोकप्रिय 7 सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने या एमपीव्हीमध्ये अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये तुम्हाला मजबूत इंजिनसोबतच अधिक मायलेज पाहायला मिळेल. कंपनीने ही 7 सीटर MPV बाजारात ₹ 8.35 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे

मारुती सुझुकी एर्टिगा ही मारुती सुझुकी कंपनीची एक लोकप्रिय 7 सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने या एमपीव्हीमध्ये अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये तुम्हाला मजबूत इंजिनसोबतच अधिक मायलेज पाहायला मिळेल. कंपनीने ही 7 सीटर MPV बाजारात ₹ 8.35 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली आहे.

त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ₹ 12.79 लाख ठेवली आहे. वापरलेल्या म्हणजेच सेकंड हॅन्ड वाहनांच्या खरेदी आणि विक्रीच्या अनेक वेबसाइटवर तुम्ही ही MPV अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

कारट्रेड वेबसाइटवर ऑफर:

Maruti Suzuki Ertiga ही कंपनीची एक लोकप्रिय MPV आहे, ज्याचे 2014 मॉडेल CARTRADE वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या वेबसाईट वर या सेकंड हॅन्ड MPV ची किंमत ₹ 3.45 लाख ठेवण्यात आली आहे. तुम्हाला येथे आर्थिक सुविधा म्हणजे फायनान्सची सुविधा मिळणार नाही.

OLX वेबसाइटवर ऑफर:

Maruti Suzuki Ertiga ही कंपनीची लोकप्रिय MPV आहे, ज्याचे 2014 मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे. या MPV ची किंमत ₹ 3.60 लाख ठेवण्यात आली आहे. तुम्हाला येथे आर्थिक सुविधा मिळत नाही.

कारवाले वेबसाइटवर ऑफर:

Maruti Suzuki Ertiga ही कंपनीची लोकप्रिय MPV आहे, ज्याचे 2015 मॉडेल CARWALE वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या MPV ची किंमत ₹ 4 लाख ठेवण्यात आली आहे. तुम्हाला येथे आर्थिक सुविधा मिळत नाही.

मारुती सुझुकी एर्टिगाचे स्पेसिफिकेशन्स:

मारुती सुझुकी एर्टिगाच्या 2014 मॉडेलमध्ये 1373 cc चे इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 93.7 bhp ची कमाल पॉवर आणि 130 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे. कंपनी या लोकप्रिय MPV मध्ये अधिक मायलेज उपलब्ध करून देते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामध्ये तुम्हाला 16.02 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज मिळतो. हे ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

English Summary: Maruti suzuki ertiga purchase for 4 lakh Published on: 28 June 2022, 11:02 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters