भारत देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी ने अखेर आपली पहिली मध्यम आकाराची SUV नवीन Maruti Grand Vitara सोमवारी भारतातील बाजारपेठेत लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही 10.45 लाख एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. जे की सोबतच मारुती सुझुकीने भारतात प्रथमच मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.
या मॉडेल्स चे सर्वात जास्त बुकिंग :-
भारतात नवीन आलेली ग्रँड विटारा ही मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधील प्रमुख SUV आहे. कार निर्मात्याचे हे भारतातील पहिले मजबूत हायब्रीड उत्पादन असणार आहे. कंपनीने सांगितले आहे की ४६ ते ४७ टक्के मजबूत हायब्रीड साठी बुकिंग झालेली आहे. जे की याला देशातून पसंती मिळाली आहे. भारतात दिल्ली, हैदराबाद, पुणे तसेच मुंबई आणि बेंगळुरू येथून जास्तीत जास्त बुकिंग केले गेले आहे.
हेही वाचा:-Keeway या कंपनीने भारतामध्ये केली दोन मोटारसायकल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
इंटिरियर आणि फीचर्स :-
एसयूव्हीच्या इंटीरियरबद्दल बोलायचे म्हणले तर ते काळ्या आणि तपकिरी रंगाच्या ड्युअल-टोन थीममध्ये बनवली गेली आहे. स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरियंट शॅम्पेन गोल्ड अॅक्सेंटसह फॉक्स ब्लॅक लेदरमध्ये सीट्स डिझाइन केल्या आहेत, तर स्मार्ट हायब्रिड व्हेरियंटला सिल्व्हर एक्सेंट मिळेल. ग्रँड विटारा ही मारुती कंपनीची पहिलीच गाडी आहे जी पॅनोरॅमिक सनरूफसह आहे. जे की हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह देखील येते. तसेच बाजूची प्रकाश व्यवस्था, समोरील हवेशीर जागा, कीलेस एंट्री, मागील एसी व्हेंट्स, इंजिन सुरू/थांबण्यासाठी पुश बटण आणि USB पोर्ट यांचा समावेश आहे. अँड्रॉइड तसेच ऍपल साठी ९ इंच टच स्क्रीन दिले आहे.
हेही वाचा:-Kawasaki ने भारतात लाँच केली Z900 मोटारसायकल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
काय आहे किंमत :-
Maruti Suzuki Grand Vitara SUV या मिड साईझ SUV ची एक्स शोरूम किंमत ही १०.४५ लाख रुपये आहे तर याचे टॉप मॉडेल हे १९.६५ लाख रूपये कडे जाते. जे की व्हॅरियंट आधारावर या गाडीची किंमत ठरवली जात आहे. मात्र भारत देशातून मोठ्या प्रमाणावर या गाडीसाठी प्रतिसाद भेटलेला आहे. जे की स्वतः कंपनीचे निर्माता सांगत आहेत की आम्ही लोकांचे मन जिंकले असल्यामुळे सर्व देश आमच्या SUV ला पसंद करत आहे.
Share your comments