महिंद्रा अँड महिंद्रा आंतरराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी असून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स मॉडल्स या कंपनीने बाजारपेठेत आणले आहेत. या पार्श्वभूमीवरच महिंद्राने नवीन महिंद्रा स्कार्पिओ एन लॉन्च केली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एन या मॉडेलला सहा व्हेरिएंटमध्ये लॉंच केले असून ते म्हणजे झेड 2,झेड 4,झेड 6,झेड 8, झेड 8L आणि झेड 8L( 6s) ही आहेत.
नक्की वाचा:Volkswagen ने केली भारतात Taigun ची नवीन इडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स व किंमत
यामध्ये स्कार्पिओ यांमध्ये लॉन्च झालेली टॉप मॉडेल
स्कार्पिओ एन मध्ये लॉन्च झालेल्या टॉप मॉडेल N Z8L या मॉडेलची सुरुवातीची किंमत 23 लाख 90 हजार रुपये असून ही कार डीप फॉरेस्ट, एवरेस्ट हाइट, नेपोली ब्लॅक, डझलिंग सिल्वर, रेड रेज, रॉयल गोल्ड आणि ग्रँड कॅनियन या सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामधील दुसरे मॉडेल स्कॉर्पिओ एन Z2 हे असून हे एवरेस्ट हाइट, नेपोली ब्लॅक आणि डॅझलिंग सिल्वर या तीन रंगात उपलब्ध असणार आहे.
या स्कार्पिओ एन कारची वैशिष्ट्ये
यामध्ये स्कार्पिओ Z2 एसयूव्हीच्या सुरक्षा बद्दल विचार केला तर यामध्ये एबीएस, एबीडी, मागील पार्किंग सेन्सर्स, डुएल एअरबॅग, समोर आणि मागच्या साईडला हवेशीर डिस्क ब्रेक इत्यादी वैशिष्ट्य यामध्ये आहेत.
यासोबतच स्टार्ट आणि स्टॉप टेक्नॉलॉजी, दुसरी रो एसी व्हेंट्स, स्टिअरिंग माउंट ऑडिओ कंट्रोल सह टच स्क्रीन इन्फॉटेनमेंट स्क्रीन तसेच यूएसबी चार्जिंग पोर्ट, एक मोनोक्रोम्स मिड डिस्प्ले तसेच पावर विंडो, सेकंड रो मध्ये एक टच टंबल सीट, स्किड प्लेट्स आणि एलईडी टर्न सिग्नल सह अनेक वैशिष्ट्ये आहेत.
नक्की वाचा:भारतात BMW ची कुपे SUV ची इडिशन लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि किंमत
पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारात उपलब्ध
या स्कार्पिओ एन Z2 एस यू व्ही मध्ये 2.0 लिटर टर्बो चार्जेड युनिट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 200bhp पिक पावर आणि 370Nm पीक टॉर्क जनरेट करते.
तसेच उच्च ट्रिम पातळीच्या तुलनेत डिझेल युनिट किंचित कमी शक्तिशाली आहे. Z2 ट्रिम लेव्हल 2.2 लिटर आणि टर्बो चार्जेड डिझेल इंजिन द्वारे समर्थीत असून ते फक्त 130bhp पिक पावर आणि 300Nm पीक टॉर्क देते.
या दोनही इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्स पर्याय देण्यात आले आहेत.
स्कार्पिओ एन पेट्रोल इंजिन असलेल्या बेस Z2 ट्रीमची किंमत
पेट्रोल इंजिन असलेल्या बेस Z2 ट्रीमची सुरवातीची किंमत 11 लाख 99 हजार रुपये आहे. एवढेच नाही तर स्कार्पिओ एन बुक करणाऱ्या पहिल्या पंचवीस हजार ग्राहकांना ही एस यू व्ही सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे.
नक्की वाचा:टाटा लवकरच करतेय भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत
Share your comments