महिंद्रा अँड महिंद्रा ही कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून कारमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल या कंपनीने तयार केले आहेत. जर आपण या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विचार केला तर महिंद्राची बोलेरो आणि स्कॉर्पिओ ही दोन कार शेतकरी बंधूंच्या खास पसंतीचे आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महिंद्रा ने बोलेरो एका नव्या रुपात आणले असून हलक्या व्यावसायिक वाहन विभाग एल सी यू 2 ते साडेतीन टन श्रेणीतील अग्रेसर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने भारताच्या वाहतूक पुरवठ्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पिकप श्रेणीतील नवीन ब्रँड बोलेरो मॅक्स पिकअप सादर करत असल्याची घोषणा केली.
नक्की वाचा:Scorpio:शेतकऱ्यांसाठी आहे 'हे'खास फीचर, स्कार्पिओ-एन आहे शेतकऱ्यांची राणी
एवढेच नाही तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने बोलेरो मॅक्स पिकअप सिटी 3000 सादर करून ब्रँडच्या अनावरण देखील केले.
या कार विषयी अधिक….
कार आकर्षक वित्त योजना आणि 25000 डाऊन पेमेंट सह सात लाख 68 हजार रुपये किमतीच्या एक्स शोरूम पासून पुढे येते. ऑल न्यू बोलेरो मॅक्स पिकअप हा एक भविष्यवादी ब्रँड असून प्रगत आयएएमएक्सएक्स तंत्रज्ञान तसेच टर्न सेफ लाइट्स,
उंची समायोजित करता येण्याजोगे सीट्स, शक्तिशाली आणि कार्यक्षम इंजन तसेच या श्रेणीतील अग्रगण्य पेलोड क्षमता यासारख्या श्रेणीत पहिल्यांदाच असलेल्या अनेकानेक वैशिष्ट्यांनी हा ब्रँड परिपूर्ण आहे.
नक्की वाचा:Car News: शेतकऱ्यांच्या पसंतीच्या 'अल्टो' आता अवतरणार के-10 अवतारात, अल्टो कारचे नवे रूप
पिकप विभागातील या नवीन ब्रँडच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांचे हित जपण्याचा जो काही उद्देश आहे तो सिद्ध केला आहे.
नक्की वाचा:Royal Enfield: रॉयल एनफिल्ड लवकरच स्वस्त आणि स्टायलिश बाईक लाँच करणार, वाचा
Share your comments