Kawasaki ने Z900 ही मोटारसायकल भारतीय बाजारात 8.93 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीमध्ये लाँच केलेली आहे. जे की मोटारसायकलमध्ये कोणत्याही प्रकारचे उपग्रेड केले नाही. जे की याच्या विरुद्ध नवीन ड्युअल-टोन पेंट स्कीमच्या स्वरूपात कॉस्मेटिक अपग्रेड मिळत आहे. यात मेटॅलिक फॅंटम सिल्व्हरसह मेटॅलिक कार्बन ग्रे तसेच इबोनी कलर स्कीमसह मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे देखील मिळते. जे की या दोन्ही शेड्स ची किंमत समान आहे ना की कोणताही बदल आहे.
काय आहे खास :-
या बाईक मध्ये काही बदल केले आहेत हे सांगत आहेत की नवीन पेंट स्कीम Z900 च्या काही डिझाइन घटकांना रीफ्रेश करते. रंगसंगतीनुसार फ्रेम आणि अलॉय व्हीलला लाल आणि हिरवा रंग भेटत आहे तसेच बाइकला आक्रमक एलईडी हेडलॅम्प तसेच टाकी ला कव्हर मस्क्यूलर इंधन, स्प्लिट सीट सेटअप आणि Z-आकाराचा एलईडी टेल लॅम्प देखील मिळतो.
हेही वाचा:-Tata ने भारतात केले Nexon चे नवीन Varient लाँच, जाणून घ्या फीचर्स
948 CC चे भेटते इंजिन :-
Kawasaki Z900 ला 948 cc ला इनलाइन 4-सिलेंडर लिक्विड-कूल्ड BS-VI इंजिन मिळत आहे. जे की हे 9,500 rpm वर 123.6 bhp आणि 7,700 rpm वर 98.6 Nm पीक टॉर्क जनरेट करत असते. हे 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत तसेच साइड-स्लंग एक्झॉस्ट डिझाइन सोबत जोडलेले आहे
सस्पेंशनसाठी 41 mm USD फोर्क समोर आणि मोनो-शॉक मागील बाजूस उपलब्ध आहेत. कावासाकीने मजबूत स्टीलची बनलेली ट्रेलीस फ्रेम देखील वापरलेली आहे. ब्रेकिंगमध्ये ड्युअल 300 मिमी पेटल डिस्क आणि मागील बाजूस 250 मिमी पेटल डिस्क मिळत आहे.
जाणून घ्या फीचर्स :-
फीचर्स बद्धल बोलायचे म्हणले तर Z900 ट्रॅक्शन कंट्रोलसह येते. जे की यामध्ये असे खास आहे की मागील टायरचा कर्षण कमी झाल्याचे लक्षात आल्यावर ते पॉवर डिलिव्हरी कमी करते. एवढच नाही तर यामध्ये दोन पॉवर मोड आहेत. (कमी पॉवर मोड आणि जास्त पॉवर मोड). कमी पॉवर मोडमध्ये त्याचे आउटपुट 55 टक्के मर्यादित आहे. त्याच वेळी, स्पोर्ट, रोड, रेन आणि रायडर असे चार राइडिंग मोड आहेत. तर रायडर मोडमध्ये चालक त्याच्या मुडनुसार मोटरसायकल सेट करू शकतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी, एक TFT स्क्रीन आहे जी मुख्य तपशील दर्शवते आणि ती ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला
देखील समर्थन देते.
Share your comments