1. ऑटोमोबाईल

Bike Update: अरे वा! जावाची दमदार एन्ट्री; बाजारपेठेमध्ये सादर केली 'ही'बाईक,वाचा किंमत

जावा ही बाईक उत्पादक कंपनी सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीने बाजारपेठेत दमदार बाईक लॉन्च केली असून यामध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या बाईकचे नाव आहे 'जावा 42 बॉबर' हे होय. या लेखामध्ये आपण या बाईक विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jawa bobar 42 bike

jawa bobar 42 bike

 जावा ही बाईक उत्पादक कंपनी सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीने बाजारपेठेत दमदार बाईक लॉन्च केली असून यामध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या बाईकचे नाव आहे 'जावा 42 बॉबर' हे होय. या लेखामध्ये आपण या बाईक विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

नक्की वाचा:Bike News: परवडणाऱ्या किमतीमध्ये 'या' दोन इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये लॉन्च, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

 या बाईकचे वैशिष्ट्ये

 ही बाईक नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईलमध्ये असून या बाईक मध्ये 334 सिंगल सिलेंडर, लिक्विड कुल्ड इंजन देण्यात आलेले आहे.

तसेच या इंजिन सोबत या बाईक मध्ये 6-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहे. एवढेच नाही तर यामध्ये रायडींग साठी एबीएस कॅलिब्रेशनमध्ये सुधारणा करण्यात आली असून यामध्ये एलइडी लायटिंगसह एलसीडी डिस्प्ले आहे.

नक्की वाचा:Car News: सिट्रोइनची 'ही' इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावेल तब्बल 400 किमी, वाचा या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

तसेच या दुचाकीच्या मागच्या बाजूला एक लहान सामान ठेवण्यासाठी रॅक म्हणजेच लगेज रॅक देण्यात आला आहे.ही बाईक एकूण तीन रंगांमध्ये बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे.

 जावा 42 बॉबर बाईकची किंमत

 यामध्ये जी बाइक मिस्टिक कॉपर रंगाची आहे त्या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख सहा हजार रुपये असून यामधील मून स्टोन व्हाईट रंगाच्या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख सात हजार रुपये आहे. तसेच जास्पर रेड रंगाच्या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख 9 हजार रुपये एवढी आहे.

नक्की वाचा:यवतमाळच्या शेतकऱ्याने तयार केली भन्नाट कार; फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर

English Summary: jawa bike company launch jawa 42 bobar bike launch with attractive feature Published on: 03 October 2022, 12:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters