
renault r5 turbo ev car
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना पेव फुटले असून अनेक वाहन निर्मिती कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले आहेत. दुचाकी असो या चार चाकी वाहनक्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सध्या मोठ्या प्रमाणावर कंपन्या करत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कार निर्माता कंपनी 'रेनॉल्ट' देखील इलेक्ट्रिक कार आणणार असून या कन्सेप्ट कार 'R5 Turbo 3E' चे अनावरण केले आहे. येणाऱ्या महिन्यात पॅरिस मोटर शोमध्ये रेनॉल्ट ही नवीन कार प्रेझेंट करण्याची तयारी करत आहे.
या कारची वैशिष्ट्ये
रेनॉल्ट R5 Turbo 3E कन्सेप्ट कार मध्ये मल्टी लेयर इन्स्ट्रुमेंट कॅन्सोल, रेसिंग प्रकारचे बकेट्स सीटस, ट्यूब्युलर रोल केज, डिफ्रेन्शियल टेलिमेट्री, लेदर स्टिअरिंग व्हील, मल्टिपल एअर बॅग तसेच ड्रीफ्टिंग साठी सरळ हँड ब्रेक लिव्हर इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
ही कार इलेक्ट्रिक मोटरच्या माध्यमातून ऑपरेट होणार असून 42 kWh लिथियम आयन बॅटरी पॅकशी जोडली जाईल.इलेक्ट्रिक मोटार जास्तीत जास्त 375 एचपी पावर आणि सातशे न्यूटन मीटर जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करण्यासाठी सक्षम असेल.
या कारचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही 210 किमी प्रति तास वेगाने धावू शकेल व साडे तीन सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या कारचा लुक ट्रॅक रेसिंग कार प्रमाणे आहे. या कारमध्ये फ्रंट एअर स्प्लिटर, रेक्ड विंडस्क्रीन, उंच बोनेट, क्यूब आकाराचे बंपर,माउंट एलईडी हेडलाइट्स,
मोठे टेलगेट- माऊंटेड विंग, डिझायनर विल्स, मागच्या बाजूला धुके डिफ्युसर इत्यादी देखील वैशिष्ट्य आहे. हे कंपनीचे प्रोटोटाइप मोडेल असून अद्यापपर्यंत या कारच्या किमती बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
Share your comments