1. ऑटोमोबाईल

Car News: 'ड्राईव्ह इन 2022, पे 2023' नेमकी काय आहे होंडा कारची ही योजना? वाचा या योजनेविषयी डिटेल्स

सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून आता काही दिवसांनी दिवाळी हा सगळ्यात मोठा सण येत आहे.या सणासुदीच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक अशा ऑफर आणि आकर्षक योजना देऊ केले आहेत. म्हणजेच कार, बाईक आणि मोबाईल वर देखिल वेगळ्या प्रकारच्या आकर्षक सूट देखील दिल्या जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
attractive scheme of honda cars

attractive scheme of honda cars

 सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असून आता काही दिवसांनी दिवाळी हा सगळ्यात मोठा सण येत आहे.या सणासुदीच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक अशा ऑफर आणि आकर्षक योजना देऊ केले आहेत. म्हणजेच कार, बाईक आणि मोबाईल वर देखिल वेगळ्या प्रकारच्या आकर्षक सूट देखील दिल्या जात आहे.

याच पार्श्वभूमीवर होंडा कार्स इंडिया या कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने होंडाच्या ग्राहकांसाठी एक विशेष कार वित्त योजना सुरू करण्याची घोषणा केली असून त्यांची ही योजना काय आहे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Bike News: जबरदस्त वैशिष्ट्यांसह हिरो कंपनीने लॉन्च केली आकर्षक बाईक, आहेत भरपूर वैशिष्ट्ये

 होंडा कार्स इंडियाची योजना

 वाहन निर्मिती क्षेत्रातील होंडा कार्स इंडिया या कंपनीने होंडाच्या ग्राहकांसाठी विशेष कार योजनेची घोषणा केली असून यासाठी होंडा कार्सने महिंद्रा प्राईम लिमिटेड यांच्यासोबत भागीदारी देखील केली आहे.

यामध्ये ड्राईव्ह इन 2022, पे 2023 या योजनेअंतर्गत ग्राहकांनी 2022 मध्ये होंडा कार खरेदी करण्याचा आणि सन 2023 पासून नियमितपणे कारचे हप्ते अर्थात ईएमआय भरण्याचा यामध्ये पर्याय ग्राहकांना मिळेल.

नक्की वाचा:Hero Splendor Plus : काय सांगता! 'या' वेबसाईटवर आली आहे भन्नाट ऑफर…! अवघ्या दहा हजारात मिळतेय नवी कोरी स्प्लेंडर

परंतु यामध्ये अट अशी आहे की ही योजना फक्त होंडा कार्स इंडिया कंपनीच्या फक्त होंडा सिटी आणि होंडा अमेझ या दोनच कारवर लागू आहे.

याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की,या योजनेच्या माध्यमातून कार घेणाऱ्या ग्राहकांचा खरेदीचा अनुभव वाढवण्याचा आणि स्वतःची कार घेण्याची  प्रत्येकाची इच्छा असते ती पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे.  विशेष म्हणजे ही योजना तात्काळ लागू होत असून होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या सर्व प्रकारांसाठी आणि

देशातील सर्व अधिकृत कोटक महिंद्रा प्राईम शाखा आणि होंडा डीलरशिपसाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध असणार आहे.त्यामध्ये संबंधित कारच्या ऑन रोड किमतीच्या 85 टक्के पर्यंत वित्तपुरवठा केला जाणार असून तुम्हाला पहिल्या तीन महिन्यांमध्ये नाममात्र हप्ता आणि चौथ्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत नियमित ईएमआय भरावा लागणार आहे.

नक्की वाचा:खुशखबर! बजाज CT 100 मिळतेय मात्र 21 हजारात, आधी संपूर्ण डिटेल्स वाचा

English Summary: honda company present attractive scheme for honda customer on honda city and amaze car Published on: 05 October 2022, 04:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters