Honda Activa : देशभरात सध्या महागाईने दमछाक केली असून, त्यामुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, आधुनिक युगात नोकरी-व्यावसायिक किंवा घरगुती उत्पन्नाशी संबंधित व्यक्ती जवळ जवळ प्रत्येकजण किमान एक दुचाकी असावी अशी इच्छा बाळगतो. मात्र, टू व्हीलर च्या किमती गगनाला भिडल्या असल्याने टू व्हिलर घेणे अनेकांना जमत नाही.
मात्र जर तुम्ही देखील टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे पुरेसा बजेट नसेल तर तुम्ही काळजी करू नका फक्त ही बातमी शेवटपर्यंत जरूर वाचा. कारण की आज आम्ही तुम्हाला अशा एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही सहजपणे दुचाकी खरेदी करू शकता.
मित्रांनो आज आम्ही Honda च्या Activa 6G स्कूटरवर सुरु असणाऱ्या एका भन्नाट ऑफर बद्दल माहिती देणार आहोत. होंडा एक्टिवाची स्कूटर घरी आणण्यासाठी आता जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. ही स्कूटर तुम्ही केवळ 8,000 रुपये खर्च करून घरी आणू शकता, ज्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
शोरूममध्ये स्कूटरची किंमत जाणून घ्या
शोरूममधील Honda च्या Activa 6G स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती 72,400 रुपयांपासून सुरू होते आणि 84,252 रुपयांपर्यंत जाते. Honda Activa चे बेस मॉडेल म्हणजेच फायनान्स प्लॅनसह स्टँडर्ड व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी फक्त रु 8,000 आवश्यक असतील. ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक तुम्हाला ही स्कूटर खरेदी करण्यासाठी 84,252 चे कर्ज देईल, ज्यावर वार्षिक 9.7 टक्के व्याज आकारले जाईल.
EMI इतका भरावा लागेल
होंडा स्कूटर घरी आणण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. कर्ज मिळण्यासोबतच तुम्हाला रु.8,000 चे डाउन पेमेंट करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, दरमहा 2,450 रुपये मासिक EMI भरावे लागेल. हा ईएमआय तीन वर्षांसाठी जमा करावा लागेल.
स्कूटरचे मायलेज आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Honda Activa 6G चे मायलेज आणि फीचर्स मजबूत देण्यात आले आहेत, जे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. Honda Activa मध्ये 109.51 cc 4-स्ट्रोक इंजिन आहे, जे फॅन-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. Honda Activa च्या मायलेजबद्दल सांगायचे तर, ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार ही स्कूटर 60 kmpl मायलेज देते.
Share your comments