हिरो कंपनी ही दुचाकी निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीने येणाऱ्या सणासुदीच्या तोंडावर एक जबरदस्त वैशिष्ट्यांनी युक्त बाईक लॉन्च केली आहे. या दुचाकीमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये असून ही बाईक हिरो कंपनीच्या एक्स्ट्रीम सिरीज मधील आहे. या दुचाकी मध्ये अनेक वैशिष्ट देण्यात आले असून ग्राहकांना आवडेल अशा प्रकारची दुचाकी आहे. या लेखात आपण या बाईकची माहिती घेऊ.
नक्की वाचा:खुशखबर! बजाज CT 100 मिळतेय मात्र 21 हजारात, आधी संपूर्ण डिटेल्स वाचा
हिरोची एक्स्ट्रीम 160R स्टील्थ एडिशन 2.0
ही एक्स्ट्रीम सीरिजमधील बाईक असून या बाईच्या डिझाईन मध्ये थोडेफार बदल करण्यात आले असून वैशिष्ट्य मात्र जबरदस्त देण्यात आलेले आहेत.या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिरो कनेक्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या बाईकचे लोकेशन देखील कळते.
यासाठी ब्लूटूथच्या माध्यमातून मोबाइल या बाइकला कनेक्ट करता येतो. जर एकंदरीत विचार केला तर या बाइकमध्ये हिरो कनेक्ट 1.0 तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे या बाईकचे लोकेशन अचूक कळते. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समजा या बाईकने स्पीड लिमिट पार केला तर आपल्याला लगेच सूचना मिळते.
नक्की वाचा:Car News: लवकरच येणार 'रेनॉल्ट'ची 'ही' इलेक्ट्रिक कार, वाचा या कारची जबरदस्त वैशिष्ट्ये
अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये टॉपल अलर्ट देण्यात आला असून जर बाईक पडली तर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज पाठविला जातो. हे बाईक दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली असून ते म्हणजे लाल आणि ब्लॅक हे होय. तिच्या मध्ये 163 सीसीचे एअर कूल्ड बी एस 6 इंजिन देण्यात आली असून
ज्यामध्ये एक्ससेन्स तंत्रज्ञान आणि ॲडव्हान्स प्रोग्राम आणि फ्युएल इंजेक्शन चा देखील समावेश करण्यात आला आहे. ही बाईक 0 ते 60 किलोमीटर प्रतितास केवळ 4.7 सेकंदांमध्ये वेग पकडते.
या बाईकची किंमत
या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 29 हजार 738 रुपये आहे.
Share your comments