सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरत असून वेगवेगळ्या प्रकारचे चारचाकी आणि दुचाकी वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे.अनेक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारतीय वाहन बाजार मध्ये दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आला असून या स्कूटर्स जीटी फोर्स या कंपनीने तयार केले आहेत.
जीटी ड्रायव्हर प्रो आणि जीटी सोल वेगस या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च
जीटी फोर्स या कंपनीने या स्कूटर लॉंच केले असून आता सणासुदीच्या मुहूर्तावर स्कूटरस ना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा कंपनीला आहे.
जीटी सोल वेगास स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये
ही स्कूटर 2 बॅटरी ऑप्शनमध्ये आली असून यामध्ये लीड ऍसिड व्हेरिएंटची किंमत 47 हजार तीनशे सत्तर रुपये असून लिथियम आयन बॅटरी व्हेरीइंटची किंमत 63641 रुपये आहे. या एक्स शोरूम किमती आहेत हे लक्षात घ्यावे.
ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 ते 60 किमी पर्यंतची रेंज देते व हीचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास इतका आहे.या स्कूटरचे वजन 95 किलो आहे.यामध्ये अँटी थेफ्ट अलर्म, रिव्हर्स मोड तसेच क्रूज कंट्रोल सोबत अनेक वैशिष्ट्ये आहेत.
जीटी ड्राईव्ह प्रोची किंमत आणि वैशिष्ट्ये
ही स्कूटर देखील 2 बॅटरी पर्यायांमध्ये सादर करण्यात आली असून या स्कूटरच्या लीड ऍसिड व्हेरिएंटची किंमत 67 हजार 208 रुपये असून यामध्ये लिथियम आयन बॅटरी व्हेरिएंटची किंमत 82 हजार 751 रुपये आहे.
लीड ऍसिड व्हेरिएंट मध्ये 1.34kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हे स्कूटर 50 ते 60 किलोमीटर पर्यंत रेंज येते तर लिथियम आयन बॅटरी व्हेरिएंटमध्ये 1.54kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ही स्कूटर 60 ते 65 किलोमीटरची रेंज देते.
या स्कूटरचे वजन 85 किलो इतके असून यामध्य अँटी थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड तसेच क्रूज कंट्रोल आणि मोबाईल चार्जिंग साठी पोर्ट देण्यात आले आहे.
नक्की वाचा:Car News: लवकरच येणार 'रेनॉल्ट'ची 'ही' इलेक्ट्रिक कार, वाचा या कारची जबरदस्त वैशिष्ट्ये
Share your comments