1. ऑटोमोबाईल

शेतकरी दादांनो! 1 जूनपासून वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स होणार महाग, वाचा आणि जाणून घ्या किती भरावा लागणार हप्ता

येणारा एक जून पासून दुचाकी,इतर मोठे वाहन आणि चारचाकी वाहनांसाठीअसलेला थर्ड पार्टी विमा आता महाग होणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
growth primium ammount for third party insurence from one june

growth primium ammount for third party insurence from one june

येणारा एक जून पासून दुचाकी,इतर मोठे वाहन आणि चारचाकी वाहनांसाठीअसलेला थर्ड पार्टी विमा आता महाग होणार आहे.

म्हणजेच या थर्ड पार्टी विम्यासाठी तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने मोटार वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स चे दर वाढवण्यासाठी एक ड्राफ्ट तयार केला असून त्यानुसार नवीन दर एक जून पासून लागू होण्याची शक्यता आहे.

 नवीन नियमानुसार किती भरावे लागतील थर्ड पार्टी इन्शुरन्स साठी पैसे

1- दुचाकी साठी- जर दुचाकींच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्याकडे जर 150 सीसी ते 350cc दरम्यान वाहन असेल तर यासाठी हप्ता 1366 रुपये बसेल आणि त्यासोबत 350cc पेक्षा जास्तइंजिन क्षमतेचे वाहन असेल तर प्रीमियम 2804 रुपये असेल.

2- इलेक्ट्रिक वाहनांवरील प्रीमियम- 30 Kw पर्यंतच्या नवीन खाजगी इलेक्ट्रिक वाहनासाठी तीन वर्षाचा सिंगल प्रीमियम पाच हजार पाचशे त्रेचाळीस रुपये असेल.

30 ते 65  Kw पेक्षा अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी प्रीमियम हा नऊ हजार 44 रुपये असेल तर मोठ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी तीन वर्षाचा प्रीमियम 20907 रुपये असेल. तर 3 Kw च्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकीसाठी 5 वर्षाचा सिंगल प्रीमियम 2466 रुपये असेल.

तर तीन ते सात किलो वॅटच्या दुचाकी वाहनांसाठी प्रीमियम तीन हजार 273 रुपये असेल. तसेच 7 ते 16 किलो वॅट साठी प्रीमियम 6260 रुपये असेल.

3- चार चाकी वाहनांसाठी- 1000cc खाजगी कार साठी 2072 रुपयांच्या तुलनेमध्ये 2094 रुपयेलागू होतील.1000 ते 1500 सीसी खाजगी कारसाठी 3221 रुपयांच्या बदल्यात तीन हजार चारशे सोळा रुपये दर आकारला जाईल.

तर पंधराशे सीसी पेक्षा जास्त क्षमता असलेल्या कारसाठी 7897 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

 महत्वाच्या बातम्या                                

नक्की वाचा:दुचाकी चारचाकी खरेदी करायची असेल तर 1 जून आधी करा, किमतीमध्ये होणार मोठी वाढ

नक्की वाचा:Mansoon: मान्सूनची कासव गती, आता राज्यात 16 जूनला मान्सूनचा पाऊस येणार; शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला

नक्की वाचा:Modi Government: मोदी सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, असा करा अर्ज

English Summary: growth primium ammount for third party insurence from one june Published on: 28 May 2022, 04:26 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters