सध्या पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितले जात आहे. असे असताना आता याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॅटरी सेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं (ईव्ही) बनवणाऱ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसत आहे.
यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींमध्ये सुमारे पाच ते सात टक्क्यांनी वाढ करतील, अशी शक्यता आहे. यामुळे तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
याबाबत कंपनी टाटा मोटर्सने सांगितले, ते जानेवारी 2023 मध्ये टियागो ईव्हीची किंमत 30 ते 35 हजार रुपयांनी वाढवणार आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागत आहे. यामुळे आता सरकारने बॅटरी सुरक्षिततेचे कठोर नियम केले आहेत.
मुंबईत कांद्याचा दर झाला दुप्पट, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
बॅटरी हे याचे कारण असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता दोन टप्प्यांमध्ये असलेल्या बॅटरी निकषांमुळे बॅटरी सुरक्षिततेत सुधारणा होतीलच शिवाय वाहनांच्या खरेदीची किंमतही वाढेल, अशी अपेक्षा आहे.
एका वेताला 3500 लिटर पर्यंत दूध, फुले त्रिवेणी गाईच्या जातीमुळे शेतकरी मालामाल..
यामुळे बॅटरीची किंमत पूर्वीच्या तुलनेत वाढेल. बॅटरींच्या किमती वाढल्याने वाहनांच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती कंपन्यांना आहे. बॅटरीसाठी तयार केलेल्या नवीन नियमांमुळे नवीन डिझाइन्स सादर होतील. यामुळे किमती किती वाढणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
मदर डेअरीकडून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, कृषी महोत्सवासाठी पाच कोटी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ
Share your comments