चीन देशातील कंपनीने ची दोन चाकी Zontes ही बाईक भारतामाध्ये 350R स्ट्रीट फायटर मोटरसायकल लॉन्च केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत रु. 3.15 लाख एक्स-शोरूम आहे. बाइकची किंमत रंगावर अवलंबून असते आणि ब्लॅक आणि व्हाइट कलर पर्यायासाठी ती 3.37 लाख रुपयांपर्यंत जाते. Zontes 350R ची ही पवास्तविक किंमत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जे की भविष्यात बाइकची किंमत वाढू शकते.
लूक आणि डिझाइन :-
लूक आणि डिझाईनच्या बाबतीत, Zontes 350R ला एक कोनीय हेडलॅम्प मिळतो, ज्यामुळे तो खूप शार्प दिसत आहे. तसेच पेट्रोल टाकी ला चांगला कव्हर, स्लॅश-कट एक्झॉस्ट आणि स्टेप-अप स्टाइल सीटसह मस्क्यूलर इंधन टाकी मिळते. मोटरसायकलला ऑल-एलईडी लाइटिंग, स्लिपर क्लच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5.0-इंच एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच कीलेस कंट्रोल्स, ड्युअल फास्ट चार्जिंग यूएसबी व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि बरेच काही मिळते. बाईकची इंधन टाकीची क्षमता 15 लिटर आहे.
हेही वाचा:-जगात सर्वाधिक जास्त दूध व्यवसायामध्ये होतेय पैशाची उलाढाल
इंजिन आणि पावर :-
Zontes 350R मोटरसायकल 348 cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे सज्ज झाली आहे. जे की हे इंजिन 9,500 rpm वर सुमारे 37.4 bhp ची पॉवर आणि 7,500 rpm वर 32 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअर उपलब्ध आहे. याशिवाय बाइकमध्ये चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. Zontes 350R ही ब्रँडची एंट्री-लेव्हल ऑफर आहे. कंपनीने याला सब-400cc मोटरसायकल स्पेसच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये प्राधान्य दिले आहे. Zontes 350R या सेगमेंटमध्ये भारतातील KTM 390 Duke आणि BMW G 310 R शी स्पर्धा करणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा:-रब्बी ज्वारीचे पीक घेताय! या प्रकारचे निवडा वाण आणि काढा मोठ्या प्रमाणावर उत्पादन
सस्पेंशन आणि ब्रेकिंग :-
बाइकला सस्पेन्शनसाठी 43 mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक मिळतो. ब्रेकिंग समोर 320 मिमी डिस्क आणि मागील बाजूस मानक म्हणून 265 एसएस रोटरसह ड्युअल चॅनेल ABS आहे. मोटरसायकल 17-इंच अलॉय व्हील आहे. भारतातील Zontes ची विक्री हैदराबाद-आधारित महावीर समूहाची उपकंपनी आदिश्वर ऑटो राइड इंडियाद्वारे केली जाते. मोटारसायकली देशभरात नवीन Moto Vault डीलरशिपद्वारे विकल्या जातील.
Share your comments