नवीन गाडी खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण काही कारणास्तव त्यांना गाडी खरेदी करता येत नाही. त्यातच सर्वसामान्य लोकांना एकाच वेळी गाडीचे सर्व पैसे भरणे शक्य नसते. त्यामुळे अनेकजण गाडी घेण्याचे टाळतात. मात्र काही कंपन्या टू व्हीलर (Two wheeler) गाड्यांवर ऑफर्स (Offers) देत आहेत. या ऑफर्समुळे अनेकांचे पैसेही वाचतात आणि गाडीही कमी किंमतीत मिळते. तसेच ग्राहकांना हफ्त्याने पैसे भरण्याचीही मुभा दिली जाते.
टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये (Bike segment) परवडणाऱ्या बाइक्सची विस्तृत श्रेणी आहे जी त्यांच्या जास्त मायलेज आणि कमी वजनासाठी पसंत केली जाते. हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) ही या सेगमेंटमध्ये अधिक मायलेज देणार्या बाइक्सपैकी एक आहे, ज्याला कमी किमतीत अधिक मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ही गाडी सर्वसामान्यांना परवडणारी आहे.
जर तुम्ही शोरूममध्ये जाऊन ही Hero HF Deluxe खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 59,890 रुपये ते 65,520 रुपये खर्च करावे लागतील. पण जर तुमच्याकडे ही बाईक घेण्याचे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या या बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती ज्यामध्ये तुम्ही ही बाईक अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकाल.
PM Kisan: महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाही आर्थिक लाभ...
Hero HF Deluxe बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर (Online websites) सूचीबद्ध केल्या आहेत ज्या सेकंड हँड बाइक्सची खरेदी आणि विक्री करतात, त्यापैकी तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे तपशील सांगणार आहोत. पहिली ऑफर QUIKR वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे या Hero HF Deluxe बाईकचे 2018 मॉडेल सूचीबद्ध केले गेले आहे.
येथे या बाईकची किंमत 25,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथे ही बाईक खरेदी करण्यासाठी कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही. दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे Hero HF Deluxe चे 2012 मॉडेल सूचीबद्ध आहे. येथे या बाईकची किंमत 22,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाइक खरेदी करताना तुम्हाला कोणताही प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.
राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात; जाणून घ्या...
तिसरी ऑफर DROOM वेबसाइटवर देण्यात आली आहे. येथे या बाईकचे 2011 चे मॉडेल लिस्ट करण्यात आले असून त्याची किंमत 18,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी करून तुम्ही फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला हफ्त्याने पैसे भरण्याची संधी देखील मिळते.
महत्वाच्या बातम्या:
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार इतका पगार, जाणून घ्या...
5 रुपयांची नोट तुम्हाला रातोरात बनवणार करोडपती; वाचा विकण्याची सोप्पी पद्धत...
Share your comments