Audi, BMW, Mercedes Benz, या काही जागतिक दर्जाचा कार निर्मात्या कंपन्या आहेत. या कंपनींची कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण मात्र अनेक लोक यांच्या अधिक किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही तर अशा लोकांसाठी आजची ही बातमी खास आहे. कारण आज आपण या कार कमी किंमतीत कशा उपलब्ध होतील याविषयी जाणून घेणार आहोत. या कंपन्यांच्या कार लक्झरीसोबतच उत्तमोत्तम फीचर्स देखील देतात. यामुळे या कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न आता पुरे होणार आहे.
या कार अनेकांना आवडतात मात्र सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना असल्या महागड्या गाड्या घेणे शक्य होत नाही. या कारच्या किमती अनेकांच्या परिस्थितीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याने इच्छा असताना देखील या गाड्या खरेदी करता येत नाहीत. देशातील सामान्य लोकांकडे असल्या महागड्या गाडीवर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.
ज्यांच्याकडे असल्या महागड्या गाडी घेण्यासाठी पैसे आहेत ते नवीन गाडी घेतात आणि ज्यांच्याकडे नाही ते वापरलेल्या किंवा सेकंड हॅन्ड कार घेण्याचा पर्याय शोधतात. आज आम्ही तुम्हाला Audi, BMW आणि Mercedes Benz या लक्झरी कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड गाड्यांची माहिती देणार आहोत. ज्यांची किंमत खूप कमी आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घेऊन त्या खरेदी देखील करू शकता. महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरून या सर्व कारची माहिती घेण्यात आली आहे.
BMW 3 Series 320D Sportline: या गाडीचं 2014 चं मॉडेल आहे या कारची किंमत येथे 13.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आजपर्यंत या कारने ने 64000 किमी अंतरापर्यंत प्रवास केली आहे. या कार मध्ये डिझेल इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन देण्यात आले आहे. ही कार पहिल्याचं मालकीची आहे. सिल्व्हर कलरची ही कार दिल्लीत विकण्यासाठी उपलब्ध झाली आहे.
AUDI Q7: या कारच 2013 चं मॉडेल वेबसाईटवर सुचिबद्ध करण्यात आल आहे. या कारची किंमत येथे 21 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारने आजपर्यंत 38000 किमी अंतरापर्यंत प्रवास केला आहे. या कारमध्ये डिझेल इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन देण्यात आलं आहे. ही कार पहिल्याच मालकीची आहे. निळ्या रंगाची ही कार दिल्लीत विकण्यासाठी उपलब्ध झाली आहे.
Mercedes Benz GLA Sport: 2015 चं मॉडेल असून या कारची किंमत येथे 23.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कार ने आजपर्यंत 23001 किमी अंतरापर्यंत प्रवास केली आहे. या कारमध्ये डिझेल इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन देण्यात आलं आहे. ही कार पहिल्याच मालकीची आहे. पांढऱ्या रंगाची ही कार मुंबईत विकण्यासाठी उपलब्ध केली आहे.
Mercedes Benz E Class: 2015 चं मॉडेल असून या कारची किंमत येथे 19.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारने आजपर्यंत 54000 किमी पर्यंत प्रवास केला आहे. या कारमध्ये डिझेल इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन दिले आहे. ही कार पहिल्या मालकीची आहे. पांढऱ्या रंगाची ही कार मुंबईत विकण्यासाठी उपलब्ध आहे.
Share your comments