बीएम डब्ल्यू इंडीया ने BMW X4 50 Jahre M Edition भारतीय बाजारपेठेत 30i व्हेरियंटसाठी 72,90,000 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला लॉन्च केले आहे. तर 30D वरिएंट ची किंमत ₹74,90,000 (एक्स-शोरूम) आहे. BMW च्या M विभागाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 50 Jahre M इडिशन भारतात आणण्यात आली. अगदी मर्यादित सिरीज मध्ये इडिशन आणली जाणार आहे. X4 च्या आधी, BMW ने त्याच्या 6 सिरीज M4 कॉम्पिटेटी आणि X7 साठी '50 Jahr M इडिशन लाँच केले.
लुक आणि डिझाईनमध्ये काय खास आहे :-
BMW च्या 'X' रेंजमध्ये SUV आणि कुपे SUV चा समावेश आहे. X4 ही एक कुपे एसयूव्ही आहे जी X3 प्रमाणेच प्लॅटफॉर्म आहे. X4 क्लासिकमध्ये 'BMW Motorsport' लोगोपासून ते प्रेरित '50 Years of M' डोअर प्रोजेक्टर आहेत. BMW च्या किडनी ग्रिल आणि त्याची फ्रेम आता काळ्या रंगात देण्यात आली आहे. अॅडॉप्टिव्ह हेडलॅम्प आता 10 मिमी पातळ आहे आणि ते ब्लॅक अॅक्सेंट आणि मॅट्रिक्स फंक्शनसह सोबत येतात. तसेच २० इंच ऍलोय व्हील भेटतात.
इंजिन आणि शक्ती :-
BMW X4 50 Jahre M Edition ला दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली आहे. हे 3 लीटर डिझेल इंजिन आणि 2 लीटर पेट्रोल इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. दोन्ही इंजिन ट्विन-टर्बोचार्ज्ड आहेत आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी आहेत. पेट्रोल इंजिन जास्तीत जास्त 252 एचपी पॉवर आणि 350 एनएम पीक टॉर्क जनरेट करते तर डिझेल इंजिन 265 hp ची पॉवर आणि 620 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
हेही वाचा:-टाटा लवकरच करतेय भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत
फीचर्स :-
फीचर्स बद्धल बोलायचे म्हणले तर इंटेरियर ला स्पोर्ट्स सीट्स, एम हेडलाइनर अँथ्रासाइट आणि एम लेदर स्टीयरिंग व्हील आहेत. जे की सोबतच पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, थ्रि-झोन क्लायमेट कंट्रोल आणि यासोबत अजून बरेच आहे.
Share your comments