रॉयल एनफिल्ड लवकरच भारतीय दुचाकी उत्पादक बजाज ऑटोशी स्पर्धा करू शकते. नवीन मॉडेल विकसित करण्यासाठी बजाज ने UK च्या Triumph मोटारसायकल सोबत भागीदारी केलेली आहे. या भागीदारिमध्ये भारतात 350cc सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. सध्या मोटारसायकलवर विकसित होत आहे. नवीन बाईक अलीकडेच यूकेमध्ये चाचणी करताना दिसली आहे. मॉडेलचे नाव अजून निश्चित केले नाही.
सध्या दोन्ही कंपन्या दोन मॉडेल्सवर काम करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार बजाज आणि ट्रायम्फ नवीन मोटरसायकलचे नाव स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर स्टाइलच्या नावावर ठेवू शकतात. यामध्ये विशेष स्टाइलिंग घटक मिळतात जे सामान्यतः ट्रायम्फ मोटरसायकलला दिसत असतात. लॉन्च केल्यावर, नवीन बजाज-ट्रायम्फ मोटरसायकल 300cc सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया, येझदी आणि केटीएमला टक्कर देणार आहे.
हेही वाचा:-भूमिहीन शेतकऱ्याने नाममात्र करारावर शेती करून साधली प्रगती, वाचा सविस्तर
बाईकची डिझाईन सुद्धा छान असेल :-
दोन्ही येणाऱ्या बाइकला राउंड पेट्रोल टाकीसह गोल हेडलॅम्प मिळण्याची शक्यता आहे. नवीन मोटरसायकल नवीन Pulsar 250 प्रमाणेच ट्यूबलर स्टील फ्रेमवर आधारित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन बजाज-ट्रायम्फ मोटरसायकल USD फ्रंट फोर्क्स, रिअर मोनोशॉक, 19-इंच फ्रंट आणि 17-इंच मागील चाकांसह येईल असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:-हिरो करतेय पुढच्या महिण्यात इलेक्ट्रिक स्कुटर लाँच, जाणून घ्या काय आहेत फीचर्स
शक्तिशाली असणार इंजिन :-
नवीन मोटरसायकलला सिंगल-सिलेंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे. स्पॉटेड मॉडेलला एक मोठा रेडिएटर देखील मिळाला. इंजिन लिक्विड-कूल्ड 4-व्हॉल्व्ह DOHC युनिट असेल. याशिवाय, स्क्रॅम्बलरला ट्विन स्टॅक एक्झॉस्ट युनिट मिळते. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या बजाज आणि ट्रायम्फ मोटारसायकलला भारतीय दुचाकी निर्मात्याच्या भारतातील प्लांटमध्ये तयार केल्या जातील आणि येथून इतर देशांमध्ये निर्यात केल्या जातील. बजाज-ट्रायम्फ मोटरसायकलची किंमत सुमारे 2 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Share your comments