1. ऑटोमोबाईल

Bajaj Bike : बजाज कंपनीची 'ही' गाडी मायलेज मध्ये आहे १ नंबर…! किंमत पण आहे फक्त 'इतकी'

Bajaj Bike : भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त मायलेज असलेल्या बाइक्स आहेत. आज आम्ही अशाच एका बजाज बाईकबद्दल सांगणार आहोत जी दिल्ली ते शिमला फक्त 400 रुपयेच्या पेट्रोल मध्ये जाऊ शकणार आहे. मित्रांनो बजाज कंपनी किफायतशीर टू व्हीलर बनवण्यासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखली जाते. अशा परिस्थितीत आज आपण बजाज कंपनीच्या एका भन्नाट बाईक विषयी जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
bajaj platina bike

bajaj platina bike

Bajaj Bike : भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त मायलेज असलेल्या बाइक्स आहेत. आज आम्ही अशाच एका बजाज बाईकबद्दल सांगणार आहोत जी दिल्ली ते शिमला फक्त 400 रुपयेच्या पेट्रोल मध्ये जाऊ शकणार आहे. मित्रांनो बजाज कंपनी किफायतशीर टू व्हीलर बनवण्यासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखली जाते. अशा परिस्थितीत आज आपण बजाज कंपनीच्या एका भन्नाट बाईक विषयी जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या बाईक विषयी जाणून घेणार आहोत त्या बाईकचे मायलेज इतके मजबूत आहे की कमी पेट्रोलमध्ये ती लांबचे अंतर कापू शकते. मित्रांनो आम्ही बजाज कंपनीच्या बजाज प्लॅटिना 110 बद्दल बोलत आहोत. जास्त मायलेज देणारी बाइक म्हणून ही भारतात खूपच लोकप्रिय झाली आहे.

या बाईक मध्ये चांगले मायलेज देण्याची क्षमता असल्याने मध्यमवर्गीय लोकांमध्ये या बाइकची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही देखील उत्तम मायलेजची बाईक शोधत असाल तर बजाज प्लेटिना 110 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

बजाज प्लॅटिना 110

कंपनीने या बाइकमध्ये 115 सीसी इंजिन दिले आहे, जे 7000 rpm वर 6.3 kV पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन 5 स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही बाईक दिल्लीत Rs.59,216 च्या एक्स-शोरूम किंमतीसह उपलब्ध आहे.

मायलेजच्या बाबतीत कंपनीचा दावा आहे की ही बाईक 84 kmpl चा मायलेज देऊ शकते. मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. सणासुदीच्या काळात तुम्ही बाइक खरेदी करणार असाल तर ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते. यावर विशेष सवलत दिली जात आहे. अशा प्रकारे, आपण कमी किंमतीत ही बाईक खरेदी करता येणार आहे.

वैशिष्ट्ये

कंपनीने बजाज प्लॅटिना 110 मध्ये एबीएस फीचर, इंटिग्रेटेड डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, एबीएस दर्शविणारा अॅनालॉग स्पीडोमीटर यांसारखी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये दिली आहेत.

English Summary: bajaj bike platina 110 price and specification Published on: 01 October 2022, 11:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters