1. पशुधन

अजबच ! बैलाची शिंगे पाहून व्हाल थक्क ; ८ फुटांपेक्षा जास्त लांब आहेत शिंगे

आजकाल इंटरनेटच्या महाजालात अनेक आश्चर्यकारक माहितीचा खजिना उलगडतो. अमेरिकेतील टेक्सास येथील एका बैलाची कहाणी ही याचे उत्तम उदाहरण आहे. टेक्सास येथील टफ चेक्स या वळूने सर्वात लांब शिंगे असण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

KJ Staff
KJ Staff
Photo - guinness world records

Photo - guinness world records


आजकाल इंटरनेटच्या महाजालात अनेक आश्चर्यकारक माहितीचा खजिना उलगडतो. अमेरिकेतील टेक्सास येथील एका बैलाची कहाणी ही याचे उत्तम उदाहरण आहे. टेक्सास येथील टफ चेक्स या वळूने सर्वात लांब शिंगे असण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या छायाचित्रांना आपण विसरू शकत नाही अशी स्थिती आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची पोस्ट प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये अतिशय असामान्य आणि एका भव्य बैलाची माहिती दिली आहे. या अधिकृत पोस्टनुसार अमेरिकेतील ओक्लाहोमा, ओव्हरब्रुक येथे या वळूचे संगोपन करण्यात आले  आहे. नंतर या वळूला २०१७ मध्ये टेक्सास येथे आणण्यात आले. चेक्सची शिंगे भली मोठी आहेत. त्याचे मोजमाप केले असता, शिंगांची एकूण लांबी २६२.५ सें. मी. म्हणजेच ८.६ फूट असल्याचे दिसून आले. टेक्सासच्या या बैलाच्या शिंगांची सरासरी लांबी ४ फूट आहे. या विक्रमी बैलाची किंमत  ५००,००० डॉलर्स मोजण्यात आली असून हा बैल परिसरात आकर्षण बनला आहे. टेक्सासमध्ये काउबॉय म्हटल्या गेलेल्या टफ चेक्सने ८.६ फूट लांबीसह सर्वात लांब शिंगे असल्याचा बहुमान मिळवला आहे.

 

या शिंगांची लांबी एखाद्या मोठ्या ख्रिसमस ट्रीपेक्षा मोठी असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. ९ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर आलेल्या या पोस्टला आतापर्यंत १८, ४०० जणांनी लाइक केले आहे. नेटिझन्स या बैलाच्या शिंगांची अविश्वसनीय लांबी पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. त्याविषयी कुतूहलाने कमेंट्समध्ये अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

किती लांब आणि वजनदार आहेत ही शिंगे? अशी विचारणा एका इन्स्टाग्राम युझरने केली आहे. तर दुसऱ्याने वॉव्व, इतकी प्रचंड शिंगे ! असे उद्गार काढले आहेत. आणखी एका व्यक्तीने भव्य शिंगे अशी टिप्पणी केली आहे. ५००,०००  लाख डॉलर्स किंमत असलेल्या आणि परिसरातील आकर्षण बनलेल्या या रेकॉर्ड ब्रेक बैलाबाबत तुम्हालाही आश्चर्यच वाटेल यात शंका नाही.

 

English Summary: You will be amazed to see the horns of the bull; The horns are more than 8 feet long Published on: 14 October 2020, 02:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters