शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर यासाठी लागणारे भांडवल आणि जागा इत्यादी आवश्यक गोष्टी जास्त प्रमाणात लागतात. परंतु त्या तुलनेत शेळीपालनाचा विचार केला तर कमीत कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येणारे व्यवसाय असून कमी गुंतवणुकीतुन चांगला नफा देण्याची क्षमता या व्यवसायामध्ये आहे.
अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत असून शासनाच्या माध्यमातून देखील विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक या व्यवसायासाठी केली जात आहे. त्यात आपण अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:Important:'लंम्पी'आजाराची लक्षणे व उपाययोजना, वाचा सविस्तर माहिती
10 शेळ्यांवर मिळते कर्ज
जर तुम्हाला शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरुवातीला अगदी दहा शेळ्या विकत घेऊन करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
जर तुमचा असा काही प्लॅन असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन शेळी पालन योजना 2022 अंतर्गत शेंळ्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. हे कर्ज तुम्हाला 11.20 टक्के व्याज दराने उपलब्ध होते.
नक्की वाचा:Dairy Farming: डेअरी फार्मिंग म्हणजे काय? कशी करावी सुरुवात? कर्ज आणि सबसिडी…
लागणारी कागदपत्रे
यासाठी तुम्हाला आधार कार्ड,रेशन कार्ड तसेचलाईट बिल ची झेरॉक्स प्रत,तुमच्या गोट फार्मचा प्रोजेक्ट रिपोर्ट,किमान सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे.
शेळी पालनासाठी अर्ज कसा करावा?
यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन शेळी पालन करण्यासाठी अर्ज करावा लागेल. या अर्जामध्ये तुमच्या गोट फार्मशी संबंधित सगळी माहिती नमूद करावी लागेल व त्यासोबतच लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे देखील लागतील.
तुमचा फॉर्म व्हेरिफाय केल्यानंतर त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यास तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. आत्ता तुम्हाला तुमच्या व्यवसाय विषयी सगळी माहिती बँकेत व्यवस्थित समजावून सांगता आली पाहिजे जेणेकरून बँकेचा विश्वास बसणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
या बँकांमध्ये करू शकतात कर्जासाठी अर्ज
तसे पाहायला गेले तर बहुतेक बँका पशुपालना संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज सुविधा देतात परंतु काही बँका शेळ्यायांसारख्या लहान जनावरांसाठी कर्ज देतात.
यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया,आयडीबीआय बँक,कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर या बँकांच्या शिवाय नाबार्डकडून देखील शेतकऱ्यांना कर्ज व अनुदानाची सुविधा दिली जात आहे.
Share your comments