शेती करताना तुम्ही तर शेतीला जोडधंदा म्हणून एखादा चांगला व्यवसाय करायचा विचार करत असालआणि तो तुम्हाला कमी गुंतवणुकीत करायचा असेल तर डेरी व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. या दिवसांमध्ये नुकसानीची शक्यता फारच कमी असते. डेरी प्रॉडक्ट बनवून वते विकून चांगला नफा कमावता येऊ शकतो.
या व्यवसायाला बाराही महिने चांगली मागणी असते.पाच लाख रुपये गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत व्यवसायाद्वारेउत्पन्न मिळू शकते.
सरकारच्या मुद्रा योजनेची या व्यवसायासाठी होईल मदत
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकारही मदत करते. छोट्या व्यवसायासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत लोन देते.केवळ कर्जचनाही तर सरकार पैशांचं सहयाप्रोजेक्ट बाबत संपूर्ण माहिती देते. डेअरी प्रोडक्ट साठी एकूण कॉस्ट 16.5लाख रुपये आहे.
परंतु सरकार या फंडच्या 70 टक्के लोन देते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला स्वतःकडून पाच लाख रुपये भांडवल टाकावे लागते व उरलेले 7.5 लाख रुपये टर्म लोन आणि चार लाख रुपये वर्किंग कॅपिटल रुपात बँक देते.
पंतप्रधान मुद्रा योजनेचा प्रकल्पानुसार डेरी व्यवसायात वर्षाला 75 हजार फ्लेवर्ड मिल्क व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर बटर आणि 4500 किलोग्रॅम तुपाचा व्यवसाय या द्वारे होऊ शकतो.म्हणजे जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नवर होऊ शकतो. ज्या 74 लाख रुपये कॉस्टिंग होईल तर 14 टक्के व्याजानंतरजवळपास आठ लाखांची बचत होऊ शकते.
या व्यवसायासाठी लागणारी जागा
डेअरी बिझनेस सुरू करण्यासाठी एक हजार स्क्वेअर फूट जागेची गरज लागते. ज्यात पाचशे स्क्वेअर फुट प्रोसेसिंग एरिया, 150 स्क्वेअर फुट मध्ये रेफ्रिजरेटर रूम, 150 स्क्वेअर फुट मध्ये वाशिंग एरिया, शंभर स्क्वेअर फुट जागा ऑफिस आणि इतर सुविधांसाठी लागू शकते.
लागणारा कच्चामाल
दर महिन्याला 12 हजार 500 लिटर दूध खरेदी, 1000 किलो ग्रॅम साखर, 200 किलोग्राम फ्लेवर्स, 625 किलो मसाले खरेदी करावे लागू शकते.
मिळणारा नफा
82.5लाख टर्न ओव्हर मध्ये वार्षिक गुंतवणूक 74.40 लाख रुपये आहे. जास्त 14 टक्के व्याज समाविष्ट आहे म्हणजेच 8.10 लाख रुपये वार्षिक न पाहू शकतो.
स्त्रोत- न्यूज18 लोकमत
Share your comments