Animal Husbandry News : शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. यामुळे यातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मिळते. तसंच सरकारकडून देखील दूध उत्पादकांसाठी नवनवीन योजना देखील राबवल्या जातात. तसंच जनावरांची संख्या जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आता टॅगीग देखील केलं जात आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी, म्हशी, डुक्कर आणि बकऱ्यांच्या कानात टॅग लावण्याच्या योजनेवर काम करत आहे. याचे फायदे देखील आहेत.
जनावरांच्या कानात का असतो पिवळा टॅग?
अनेकदा आपल्या गाई-म्हैशी आणि इतर जनावरांच्या कानात पिवळा टॅग दिसून येतो. त्याला जनावरांचे आधार कार्ड म्हटले जाते. जसे माणसांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असते. तसेच जनावरांचे देखील आजकाल आधार कार्ड तयार केले जात आहे. गाई-म्हशींच्या कानाला लावलेला टॅगही महत्त्वाचा आहे, जो त्यांच्यासाठी आधार कार्डापेक्षा कमी नाही. यामध्ये देखील सगळी माहिती आपल्याला समजणार आहे.
याबाबत माहिती अशी की, जनावरांना हा टॅग लसीकरणापूर्वी लावला जातो. केंद्राच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राण्यांना FMD, खूर आणि तोंड आणि ब्रुसेलोसिस विरुद्ध लसीकरण केले जाते. याआधी, लसीकरणाची माहिती अद्ययावत राहण्यासाठी आणि ओळखीसाठी जनावरांच्या कानात टॅग लावले जातात.
टॅग लावल्यानंतर जनावरांची माहिती अपलोड
टॅग लावताना प्राण्यांना १२ अंकी ओळख क्रमांक देखील दिला जातो. ज्याद्वारे लसीकरणाची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते. प्राण्यांची नोंदणी माहिती नेटवर्क पशु उत्पादकता आणि आरोग्य प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाते. जनावराचे लसीकरण तसेच इतर गोष्टी देखील सेव्ह केल्या जातात. यामुळे जनावर आजारी पडले तरी त्याची माहिती लगेच मिळते.
दरम्यान, टॅगच्या आधारे अनेक योजनांचा लाभ घेता येईल. विविध योजनांमध्ये टॅग केलेल्या नोंदणीकृत जनावरांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर प्राण्यांच्या विम्यामध्ये हा टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. तर जनावरांची चोरी झाल्यास हा टॅग अतिशय फायदेशीर आहे, ज्याद्वारे जनावरांचा शोध घेता येतो. यामुळे तुम्ही देखील आपल्या जनावरांना हा टॅग लावून घ्या.
Share your comments