1. पशुधन

चाराटंचाई आहे! अशा पद्धतीने करा जनावरांच्या चाराव्यवस्थापन होईल फायदा

नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना न देता कधीही निर्माण होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती विविध स्वरूपामध्ये आपल्या समोर येऊन उभे राहू शकते.मुख्यत्वे:ही सर्व संकटे ग्लोबल वार्मिंग मुळे निर्माण होतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
animal fodder management

animal fodder management

नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना न देता कधीही निर्माण होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती विविध स्वरूपामध्ये आपल्या समोर येऊन उभे राहू शकते.मुख्यत्वे:ही सर्व संकटे ग्लोबल वार्मिंग मुळे निर्माण होतात.

अचानक येणाऱ्या या संकटामुळे अन्न,खाद्य, चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण होते.ज्यामुळे मानवी शरीरावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.

  • चारा टंचाई दरम्यान आहार व्यवस्थापन :-

पाण्याची गरज :- चारा टंचाई मध्ये पूर्तता किंवा उपलब्धता करून देणे खूप महत्त्वाचे ठरते पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच विविध पोषणमूल्ये शरीरातील एका भागातून तिसऱ्या भागात नेआन करण्यासाठी महत्त्वपूर्ण असते.मोठ्या जनावरांना पाणी कमी प्रमाणात किंवा ठराविक वेळेस उपलब्ध करून द्यावे. पाणी नियंत्रित प्रमाणात दिल्यामुळे जनावर खाद्याचे सेवन कमी करते. खाद्य जास्त वेळेसाठीकोठी  पोटामध्ये राहिल्याने खांद्याची कार्यक्षमता व पचन क्षमता यामध्ये सुधारणा होते. पाणी शरीरात नियंत्रित प्रमाणात गेल्यामुळे मूत्राद्वारे कमी प्रमाणात बाहेर निघते. ज्यामुळे एका प्रकारे भुकेवर अंकुश निर्माण होतो याउलट पाणीटंचाई जास्त प्रमाणात निर्माण झाल्यास जनावर डीहायड्रेशन मध्ये जाऊ शकते. यामध्ये शहरातील प्रथिनांचे कॅटाबोलिझम होऊन कालांतराने मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते.

  • चाफिंग:- जनावरांना खाण्यासाठी चारा उपलब्ध नसल्यासचाफिंग(कुट्टी) प्रक्रियेद्वारे एरव्ही वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण कमी करता येते.चाफिंगन करता दिलेलाचारा किंवा पेंडा जनावरांकडून 15 टक्के ते 20 टक्के असा सोडला जातो. या प्रक्रियेमध्ये जनावरांच्या निवडक खाद्य घटक खाण्याच्या सवयी ला आळा बसतो. योग्य त्या खाद्य कुंडाच्या वापर केल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच कुट्टी करून देण्यात येणाऱ्या साऱ्यामुळे चवर्णकरण्यात कमी ऊर्जा खर्च होते.वही ऊर्जा जनावर शरीराच्या मेंटनस साठी वापरू शकते.
  • निर्बंधित आहार:- आहारावर प्रतिबंध आणल्यामुळे शरीरातील प्रक्रियांचा वेग मंदावतो.यकृता मधूनमुक्तमेदाम्लांचीजास्त प्रमाणात निर्मिती होते.यामुळे जनावर कमी प्रमाणात पाणी पिते. परंतु या उलट खांद्यावर प्रमाणापेक्षा जास्त निर्बंध आणले गेले असतायकृताद्वारेग्लुटामीन ची  निर्मिती जास्त प्रमाणात होते. ज्याचा परिणाम संप्रेरकांच्या माध्यमातून दिसून येतो.
  • साठवून ठेवलेल्या चाऱ्याचा वापर :-दुष्काळ किंवा पूर सदृश परिस्थिती दरम्यान खाद्य आणि चाऱ्याची तीव्रकमतरता निर्माण होते. मागणी आणि पुरवठा यातील ही दरी भरून काढण्यासाठी हिरवा तसेच वाळलेला चारा दुसऱ्याभागातून मागविला जाऊ शकतो एरव्ही वाया जाणाऱ्या फळे आणि भाजीपाल्यांचे भाग यांचादेखील उपयोग अशा वेळेस करता येतो. तसेच पारंपारिक किंवा अपारंपारिक सारा पिकाचा वापर करून बनवलेले मूरघास चारा टंचाईच्या काळात फायदेशीर ठरते.
  • हायड्रोपोनिक चारा पद्धती :-दुष्काळाच्या वेळी निर्माण होणारे हिरव्या चाऱ्याची तिव्रकमतरता हायड्रोपोनिकचाऱ्याद्वारे पूर्ण करता येते. कमीत कमी जागेत तसेच कमी पाणी वापरून हायड्रोपोनिक चाऱ्याची निर्मिती करता येते. हायड्रोपोनिक युनिटमध्ये विशिष्ट प्रकारच्या ट्रेज  चा उपयोग करून चारा निर्मिती केली जाते.
  • फायदे :-
  • कमी जागेत व कमी पाण्यात उत्पादन घेता येते.
  • चारा टंचाईच्या काळात पोषण मिळाल्याचा उत्तम स्त्रोत.
  • रासायनिक खतांचा वापर नसल्यामुळे नैसर्गिक चारा
  • दुधाच्या गुणवत्तेमध्ये चांगला फरक दिसून येतो.
  • प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्ये व जीवनसत्वांचे चांगले प्रमाण
  • पशुखाद्याची बचत
English Summary: when drought situation fodder dificiency that good option to fodder management Published on: 04 March 2022, 07:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters