शेतकरी शेतीसोबत कोंबडी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. आपण पाहिले तर ग्रामीण भागात कोंबडी पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. कोंबड्या (hen) स्वतःचे खाद्य स्वतःच शोधून खात असतात.
मात्र जेव्हा शेतकरी (farmers) व्यवसायिक दृष्टीकोनातून कुक्कुटपालन करत असतो तेव्हा कोंबड्याना चांगले खाद्य देणे गरजेचे असते. कोंबड्याचे पालन व्यवसाय म्हणून करताना त्यांचा आहार, आरोग्य, पाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सध्या खाद्य तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती (Prices of raw materials) सतत वाढत असल्याने, खाद्यावरचा खर्चही वाढत आहे. कोंबड्याचे खाद्य तयार करण्यासाठी मका आणि सोयाबीन पेंडचा वापर प्रामुख्याने केला जातो.
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात
हे दोन घटक उर्जा आणि प्रथिनांचा स्रोत म्हणून वापरले जातात. कोंबड्यांचे (hen) खाद्य बनविण्यासाठी ३० ते ४० टक्के सोयाबीन पेंडचा वापर केला जातो. सोयाबीन पेंडीला पर्यायी खाद्यघटकांची निवड करताना त्या विशिष्ट खाद्य घटकांचा किती प्रमाणात आहारात समावेश करावा ? याचे प्रमाण कोंबड्याच्या प्रकारानुसार बदलत असते.
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांचे खाद्य प्रमाण वेगवेगळे असते. ब्रॉयलर कोंबड्यांच्या (broiler chickens) आहारात प्री-स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशरचा समावेश केला जातो. तर लेयर कोंबड्यांना स्मॅश फीड, ग्रोवर आणि लेयर फीडचा समावेश करण्यात येतो.
कोंबड्यांचे खरेदी (Purchase chickens) करताना काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. कोंबड्यांना देण्यात येणारे खाद्य ताजे असावे. त्यात प्रमाणित ओलावा असला पाहिजे. या नियमांचे पालन केल्यास कोंबडी मांसाने मोठी होती. मांस भरपूर पडते त्यामुळे कोंबडीला किंमतही चांगली मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच होतो.
महत्वाच्या बातम्या
गाभण शेळयांची काळजी कशा प्रकारे घ्यावी? वाचा सविस्तर
बाप्पाचे विसर्जन करताना 'या' मंत्राचा जप करा; होणार गणरायाची कृपादृष्टी
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
Share your comments