२०१७ साली पासून बैलगाडा शर्यत बंद झाली होती जे की शर्यतीखाली प्राणीमात्रांवर अत्याचार होत आहे असे प्रनिमित्रांचे मत असल्याने यावर बंदी घालण्यात आली होती. कोरोना काळामध्ये सुद्धा बैलांचा बाजार बंद होता त्यामुळे सर्व काही थांबले होते तसेच बैलगाडा शर्यती चालू नसल्यामुळे सर्व व्यवहार थांबले होते तर त्यांच्या खाण्यासाठी चारा सुद्धा उपलब्ध होत नसल्यामुळे मागेल त्या किमतीमध्ये बैलविक्री सुरू होती. पण मागील काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर असणारी बंदी उठवताच बैलांच्या किमती लाखो रुपयांमध्ये पोहचल्या. बैल विकत घेण्यास तुटवडा पडत असल्याची बातमी समोर आली आहे. असाच एक पुण्यातला बैल एका फ्लॅट च्या किमतीमध्ये विकला गेला आहे.
बजरंग बैल विकला २५ लाखला:-
पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी येथील प्रमोद डुंगरे या शेतकऱ्याकडे बजरंग नावाचा एका बैल होता. अगदी खाऊन पिऊन त्यास मजबूत बनवला होता. जे की तेथील पंचक्रोशीत बजरंग बैलाच्या नादाला कोणीच लागणार नाही असा हा बैल बैलगाडा शर्यतीमध्ये पहिला च नंबर काढायचा. आता पर्यंत जेवढ्या बैलगाडा शर्यती झाल्या आहेत त्या शर्यतीमधड बजरंग ला पहिले बक्षीस मिळाले आहे. जो की खूप असे अनेक बैलगाडा शर्यतप्रेमी होते ते त्या बैलाला विकत घेण्यास टपून बसले होते मात्र बजरंग काय ३-४ लाखात विकणारा बैल न्हवता तर बजरंग ला २५ लाख रुपयांची बोली लागली होती. प्रमोद डुंगरे यांच्या डुंबरवाडी गावातीलच दोघा भावांनी चक्क २५ लाख रुपये रक्कम मोजत हा बैल विकत घेतला आहे.
पिंट्या सोबत धावणार बजरंग :-
बबन डुंगरे आणि किशोर डुंगरे या दोन भावांनी सर्वकाही पणाला लावून बजरंग ला घेण्यासाठी चक्क २५ लाख रुपये म्हणजे पुण्यातील एका फ्लॅट ची किमंत दिलेली आहे.आता पर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैशाला विकला जाणारा बैल म्हणजे बजरंग बैल आहे. बबन आणि किशोर या दोघांकडे आधी एक पिंट्या नावाचा बैल होता व त्याच्या बरोबरीस त्यांना अजून एक मजबूत बैल पाहिजे होता जो की २५ लाख देऊन बजरंग ला विकत घेतले. पुढील येणाऱ्या शर्यतीमध्ये पिंट्या सोबत बजरंग बैल धावणार आहे.
बजरंगला नावजावे एवढे कमीच :-
एकदा की बजरंग शर्यतीमध्ये उतरला की तिथे फक्त एकच आवाज घुमतो तो म्हणजे बजरंग आणि बजरंगच. पूर्ण पंचक्रोशीतील लोक बजरंग ची शर्यत पाहण्यास येत असतात. असा हा पांढरा शुभ्र आणि मजबूत व चपळ चालेचा बजरंग पुन्हा एकदा त्याच मजबुतीने मैदानात उतरला आहे. जे की पुढच्या शर्यतीला बजरंग पिंट्या सोबत पळणार असल्याची माहिती डुंगरे बंधूनी दिलेली आहे. पुढची शर्यत कधी येतेय आणि पिंट्या बजरंग सोबत कसा धावेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments