1. पशुधन

पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..

दूध काढण्यापूर्वी गोठ्यात मधुर संगीत लावतात. दूध काढण्याआधी गाई धुवून त्या वाळण्यासाठी रेस्टिंग जागेमध्ये थांबवतात. दूध काढण्यापूर्वी गाई-म्हशी पूर्णपणे पान्हवून घेतात. जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या दिवसातून तीन वेळा धारा काढल्या जातात. दूध काढण्याची क्रिया ७ ते ८ मिनिटांत पूर्ण करतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Punjab cattle farmers (image google)

Punjab cattle farmers (image google)

दूध काढण्यापूर्वी गोठ्यात मधुर संगीत लावतात.
• दूध काढण्याआधी गाई धुवून त्या वाळण्यासाठी रेस्टिंग जागेमध्ये थांबवतात.
• दूध काढण्यापूर्वी गाई-म्हशी पूर्णपणे पान्हवून घेतात.
• जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या दिवसातून तीन वेळा धारा काढल्या जातात.
• दूध काढण्याची क्रिया ७ ते ८ मिनिटांत पूर्ण करतात.

दूध काढण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर कासेतील दूध पूर्णपणे निघल्याची खात्री करतात.
• सकाळी व संध्याकाळी दुध काढण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळतात.
• धार काढण्याच्या वेळी मिल्कर शिवाय मिल्किंग पार्लर मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
• धार काढतांना दररोज मिल्किंग मशीन चे प्रेशर तपासले जाते.

जनावराला वाढीच्या स्थितीनुसार खनिज मिश्रणे व जीवनसत्वे पुरवली जातात.
• छोट्या-छोट्या गोठ्यामध्ये धार काढण्यापूर्वी गाईची कास नेहमी कोमट पाण्याने धुवून त्यानंतर ती चांगली पुसली जाते.
• छोट्या गोठ्यामध्ये दूधाचे कॅन धुण्यासाठी मोठे ब्रश वापरले जातात व ते कॅन ड्रायरखाली किंवा उन्हात वाळवले जातात.

मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक

• मिल्किंग पार्लर मुळे एक व्यक्ती सात मिनिटात ३,६,९,१२ पेक्षा जास्त गाईंची धार एकावेळी काढतात.
• दूध काढण्यासाठी खास करून मिल्किंग पार्लर बनवले जातात.
• मिल्किंग पार्लर मध्ये धार काढताना गाई अजिबात हालत नाहीत.
• जनावरांच्या पायाला भाला घालण्याची सवय अजिबात नसते.

• धार काढताना गाईला चारा व पशू आहार दिला जात नाही तर तो धार काढून झाल्यावर जनावरांना टी.एम.आर दिला जातो.
• धार काढताना दररोज दुधाची चव, रंग, वास तपासून पहावा शंका वाटल्यास दूध दुसऱ्या गाईच्या दुधात मिसळू नये.
• स्तनदाह आजार झालेली गाई लगेच गोठ्यातून वेगळी केली जाते त्या गाईचे दुध मिल्किंग मशीन ने न काढता हाताने काढले जाते व काढलेले दूध फेकून दिले जाते.

• मिल्किंग मशीन ने धार काढल्यामुळे सडांची लांबी व कासेचा आकार वाढत नाही तसेच सडाला इजा ही होत नाही.
• दूधाची साठवणूक ते मिल्क बल्क कुलर मध्ये करतात तसेच स्पर्श विरहित दूध असल्याने दूध लवकर खराब होत नाही.

"FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली"

• धार काढून झाल्यावर गाई-म्हशींचे सड न चुकता दररोज जंतुनाशक द्रावणामध्ये बुडवले जाते.
• गाई-म्हशींची खूरे वाढलेली असतील तर हुफ ट्रिमिंग किंवा हुफ बॅलन्सिंग केले जाते.
• गाई व म्हशीच्या अंगावर केस जास्त प्रमाणात झाले असतील तर ते ट्रिमर ने काढून घेतले जातात.
• टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
• लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 800731359. ईमेल-nitin.dhenoo94@gmail.com

मका लागवड, संपूर्ण माहिती जाणून घ्या
पशुसंवर्धन विभागात हजारो नोकऱ्या जाहीर, 5 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख
आता दर तीन महिन्यांनी जाहीर होणार दुधाचे खरेदी दर! आतातरी दूध उत्पादकांना न्याय मिळणार.?

English Summary: What are Punjab's cattle farmers doing to produce clean and pure milk? Find out.. Published on: 29 June 2023, 01:42 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters