दुग्धव्यवसायमध्ये जास्त नफा असल्यामुळे आजकाल युवा पिढी सुद्धा याकडे वळलेली आहे. मात्र हा दुग्धव्यवसाय परवडण्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये जातिवंत गाई-म्हैसी असणे गरजेचे आहे. जे दुधाळ जनावरे असतात त्यांच्यामध्ये काही खास गुणधर्म असतात जे की या सर्व गुणधर्मांचा विचार करून आपण जनावरे खरेदी केली पाहिजेत. आपल्याला जर दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर एका वेतातील गायीचे दूध उत्पादन हे जवळपास ३६०० लिटर असायला पाहिजे. दूध व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवायला हवे की नेहमी जनावरे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची जनावरे निवडावी. जे की त्याचे वय जवळपास ३ ते ४ वर्ष असावेच. तुम्ही कोणतेही दुधाळ जनावर घेतले तर त्या दुधाळ जनावरांच्यामध्ये एक ठराविक वय असते ज्या वयात वेतांमध्ये दुधाचे उत्पादन वाढले जाते.
दुधाचे उत्पादन वाढण्यामागे हे आहे कारण :-
जर पहिलारु कालवड असेल तर पहिल्या वेतापेक्षा दुसऱ्या वेतामध्ये जास्त दूध उत्पादन वाढलेले दिसून येते. जनावरांच्या त्या त्या वयामध्ये त्यांच्या वजनामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. जे की वयामानानुसार जनावरांच्या कासेची देखील योग्य प्रकारे वाढ होत असते. जनावरांच्या सडाचे आकारमान हे त्याच्या योग्य वयामध्ये चांगल्या प्रकारे वाढत असते. जे की या सर्व कारणांमुळे जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेमध्ये आधीच्या वेताच्या दुधापेक्षा जास्त वाढ दिसायला सुरू होते.
हेही वाचा:'या' 7 उपायांचा अवलंब करेल तुमच्या जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण, जाणून घ्या सविस्तर
या प्रकारे पशुपालक बांधू शकतात अंदाज :-
सर्वसाधारणपणे गायी आणि म्हैसी यांच्या पूर्णक्षमतेनुसार जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन हे चौथ्या तसेच पाचव्या वेतात जनावरे देत असतात. पुढील वेतामधील दूध उत्पादन स्थिर राहून त्याच्या पुढील वेतामधील दुधाचे उत्पादन हे कमी कमी होत जाते. सर्वसाधारणपणे आपल्या भागातील दुधाळ जनावरे हे चौथ्या किंवा पाचव्या वेतामध्ये किती दूध उत्पादन देतील यांचा सर्व अंदाज घेऊन पशुपालक पहिल्या वेतातील दूध उत्पादन काढू शकतात.
यासाठी खालील सुत्राचा वापर करावा :-
१. जनावराचे चौथ्या किंवा पाचव्या वेतातील दूध उत्पादन काढण्यासाठी :- पहिल्या वेतातील एकूण उत्पादन हे X १.३ असावे.
२. पहिलारु गायीचे पहिल्या वेतामधील दूध उत्पादन हे २००० लिटर एवढे असावे.
३. तर चौथ्या किंवा पाचव्या वेतात गाई २००० X १.३ = २६०० लिटर दूध उत्पादन देईल.
Share your comments