1. पशुधन

मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

नागपुरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपुरातील पशुपालकांना शासनाच्या घरपोच पशुरुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पशुपालकांसाठी केंद्रीय टोल फ्री क्रमांकही सादर करण्यात आला आहे.

veterinary services livestock keepers

veterinary services livestock keepers

नागपुरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपुरातील पशुपालकांना शासनाच्या घरपोच पशुरुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पशुपालकांसाठी केंद्रीय टोल फ्री क्रमांकही सादर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेंतर्गत 73 फिरत्या पशुचिकित्सा पथके पशुपालकांच्या घरी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजना सुरू केली आहेत. फिरत्या पशुचिकित्सा पथकांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार 73 तालुक्यामध्ये करण्यात आलेला असून पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी केले आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्रि क्रमांकावर गरजू पशुपालकांनी दुरध्वनी करुन त्यावर सेवा विनंती नोंदविल्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयात स्थापित करण्यात आलेल्या मध्यवर्ती कॉल सेंटरद्वार संबंधित विनंती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था किंवा नजीकच्या फिरत्या पशुचिकित्सालयाकडे अग्रेषित केली जाते व संबंधितद्वारे पशुरुग्णांवर उपचार करण्यात येतात. उपचारासाठी विहित कालमर्यादाही रोगलक्षणानूसार निश्चित करण्यात आले आहे.

बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

या कार्यपध्दतीनूसार योजना चालू झाल्यापासून 29 जून अखेरच्या कालावधीत फिरत्या पशुवैद्यकीय दावाखान्याद्वारे प्राप्त झालेल्या दुरध्वनीचे विवरणानूसार सेवाचा लाभ घेणाऱ्या पशुपालकांच्या संख्येमध्ये घट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर फिरते पशुवैद्यकीय पथके कार्यरत असलेल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना 1962 या टोल फ्रि क्रमांकाबाबत माहिती देवून पशुपालकांना या योजनेविषयी अवगत करावे. पशुपालकांसाठी घरपोच सेवा मिळण्यासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेस पशुपालकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम

नागपुरातील कार्यालयाचा पत्ता

कार्यालय हे भुविकास बँक कॉम्प्लेक्स, गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर, नागपूर-440032 या ठिकाणी स्थानांतरीत झाले आहे. सदर कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
मोठी बातमी ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार 'या' तारखेला

English Summary: veterinary services livestock keepers contact toll free number Published on: 23 July 2022, 10:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters