1. पशुधन

दूधउत्पादकांना दिलासा! वारणा दूध संघाने गाईच्या दूध खरेदी दरात केली 2 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांमधून समाधान

पशुपालन व्यवसाय म्हटला म्हणजे पशुखाद्य आणि चारा या मूलभूत गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर पशुखाद्याच्या आणि लागणाऱ्या चाऱ्याच्या टंचाईमुळे वाढलेले दराच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास लिटरमागे दोन रुपये वाढ देण्याची घोषणा अध्यक्ष डॉ.विनय कोरे यांनी केली. सध्या आता पुढे सणासुदीचे दिवस येत असून या सणांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादकांमध्ये समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
warna milk fedreation growth milk rate

warna milk fedreation growth milk rate

 पशुपालन व्यवसाय म्हटला म्हणजे पशुखाद्य आणि चारा या मूलभूत गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर पशुखाद्याच्या आणि लागणाऱ्या चाऱ्याच्या टंचाईमुळे वाढलेले दराच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास लिटरमागे दोन रुपये वाढ देण्याची घोषणा अध्यक्ष डॉ.विनय कोरे यांनी केली. सध्या आता पुढे सणासुदीचे दिवस येत असून या सणांच्या पार्श्‍वभूमीवर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादकांमध्ये समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नक्की वाचा:Bussiness Tips: मत्स्यपालन म्हणजे मासे विकून नफा कमावणे नव्हे,त्यासोबत करा 'हे' व्यवसाय आणि मिळवा चांगला नफा

याविषयी माहिती देताना अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी म्हटले की, "दूध उत्पादकांना चाऱ्याच्या टंचाई सोबतच अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा दूध उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक झळ बसू नये यासाठी वारणा दूध संघाने1 सप्टेंबर पासून गायीचे खरेदी दुधासाठी प्रतिलिटर दोन रुपये प्रमाणे वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

नक्की वाचा:Buffalo Farming: आता वाहणार दुधाची गंगा! या 4 जातींच्या म्हशी देतायेत 600 ते 1300 लिटर दूध...

जर आपण वारणा दूध संघाचा विचार केला तर या दूध संघाने महापुर, अतिवृष्टी आणि अवकाळीपाऊस अशा अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

यामध्ये पशुउत्पादकांच्या पशुसाठी पशुवैद्यकीय सेवा अल्पदरात उपलब्ध करून देणे,विम्याचे सुरक्षाकवच व रेडी संगोपन यासारखे अनेक उपक्रम वारणा दूध संघामार्फत राबवले जात आहेत.

जर आपण वारणानगर परिसराचा विचार केला तर गाईचा दुध दर साडेतीन फॅटला 30 वरून 32 वर झाला. त्यामुळे दूध उत्पादकांना नेहमी सवलती आणि सुविधा देणाऱ्या वारणा दूध संघ दरातही परंपरेप्रमाणे सर्वोच्च ठरला आहे.

नक्की वाचा:राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग! संकरित गाईच्या पोटी जन्म घेतला देशी गाईने, वाचा सविस्तर

English Summary: varana milk fedretion growth milk rate two rupees per liter Published on: 28 August 2022, 09:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters