जगात फार पूर्वीपासून अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोंबडी पालन करत आला आहे. जस जसे शेतीमध्ये बदल होत गेला तस-तसा पशुपालनात व कुक्कुटपालनात देखील बदल होत गेला. बदलत्या काळानुसार कुक्कुटपालन व्यापारी तत्वावर म्हणजे मोठ्या स्वरूपावर करण्यास सुरवात झाली. खरं बघायला गेले तर शेतकरी जोडधंदा म्हणुन कुक्कुटपालन करतो पण कुक्कुटपालन व्यावसायिक तत्वावर करून देखील शेतकरी शेतीप्रमाणेच त्यातून चांगली मोठी कमाई करू शकतात
कुक्कुटपालन करण्यासाठी आता सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे व अनेक योजना राबवित आहे, तसेच कुक्कुटपालन करण्यासाठी लोन उपलब्ध करून दिले जात आहे व सबसिडी देखील पुरवीत आहे.
कुक्कुटपालन करणे हे इतर पशुपालन करण्याच्या तुलनेने सोपे आहे तसेच कुक्कुटपालन व्यवसायात खर्च हा कमी येतो. त्यामुळे कमी खर्चात कुक्कुटपालन सुरु करून शेतकरी बक्कळ कमाई करू शकता. जर आपणही कुक्कुटपालन सुरु करू इच्छित असाल तर 40 हजार रुपये गुंतवून 500 कोंबड्या खरेदी करून कुक्कुटपालन सुरू करू शकता.
कुक्कुटपालनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 35 ते 40 दिवसांनंतरच या व्यवसायातून कमाई मिळायला सुरवात होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा असल्याचे सांगितले जाते. कुक्कुटपालन हे केवळ शेतकरीच करू शकतात असे नाही तर भूमिहीन देखील कुक्कुटपालन सुरु करून चांगली कमाई करू शकतात. पण त्यासाठी योग्य ती माहिती मिळवणे गरजेचे आहे.
कुक्कुटपालन करण्याचा विचार असेल तर 'ह्या' गोष्टींची घ्या खबरदारी
कुक्कुटपालन सुरु करण्यासाठी अल्पशे भांडवल, थोडी जमीन आणि थोडीफार मेहनत, तसेच मनुष्यबळ, श्रमाची आवश्यकता असते. वर नमूद केलेल्या गोष्टींची पूर्तता करून आपण देखील कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही ब्रॉयलर जातीच्या कोंबड्यांचे कुक्कुटपालन करणार असाल तर ब्रॉयलरच्या पिल्लांची देखभाल करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते.
तसेच कुक्कुटपालनात सर्वात महत्वाची गोष्ट ही पिल्लांची निवड करणे ही असते. त्यामुळे पिल्ले खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असा सल्ला कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक देतात. कोंबडीचे अशी पिल्ले विकत आणावी ज्यांचा मृत्यू दर हा 3 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. जर आपणही कुक्कुट पालन करत असाल तर पिल्लांच्या आहारावर लक्ष देणे गरजेचे असते त्यामुळे त्यांना पौष्टिक आहार दिला जाईल ह्याकडे विशेष ध्यान असू द्यावे. आहार जर उत्तम असला तर कोंबडीचे आरोग्य चांगले राहते आणि तसेच त्यांची वाढ लवकर होते आणि उत्पादन देखील चांगले मिळते.
Share your comments