1. पशुसंवर्धन

शेळ्यांच्या या जाती देतील बक्कळ कमाई

KJ Maharashtra
KJ Maharashtra
types of goat

types of goat

 डोंगराळ आणि दुष्काळी भागात शेळी पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. शेळी पानाला फार कमी खर्च येत असतो. दोन व्यक्ती ही शेळीपालनाचा व्यवसाय करू शकतात. असा मोठा नफा देणाऱ्या शेळ्यांची देशभरात पंच्याहत्तर जाती आहेत. यातील मोजक्याच जाती आहेत ज्या आपल्याला अधिक  उत्पन्न देतात. त्या जातीच्या शेळयांविषयी  आपण माहिती घेणार आहोत.

  • जमुनापारी शेळी:

या जातीच्या शेळ्या इटावा, मथुरा येथे आढळतात. या जातीच्या शेळ्या या दूध आणि मांसासाठी प्रसिद्ध आहेत. शेळ्यामधली ही सर्वात चांगली जात मानली जाते. या शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात तसेच त्यांच्या शरीरावर भुरक्या रंगाचे ठिपके असतात. या शेळ्यांची शिंगे ही आठ ते नऊ सेंटीमीटर असतात. या शेळ्या दोन ते अडीच लिटर दूध प्रति दिवस देतात.

  • बरबरी शेळी:

या जातीच्या शेळ्या आग्रा,ईटावा, अलिगड मध्ये  आढळतात. या शेळ्यांची  मागणी ही मांसा साठी अधिक असते. या शेळ्या आकाराने लहान असतात शिवाय रंगाने वेगळे असतात.  या शेळ्यांचे कान नळी प्रमाणे वळलेले असतात. या जातीच्या शेळ्या मध्ये बऱ्याच शेळ्यांचा रंग पांढरा असतो. भुरक्या रंगाचे ठिपके त्याच्या शरीरावर असतात.

 

  • बिटल शेळी:

पंजाब मध्ये या शेळ्या अधिक प्रमाणात आढळतात. दुधासाठी या शेळ्या उपयोगी आहेत. या जातीच्या शेळ्यांचा रंग हा काळा असतो तसेच त्यांच्या शरीरावर पांढऱ्या किंवा भुरक्या  रंगाचे ठिपके असतात. या शेळ्यांच्या  अंगावरील केस छोट्या आकाराचे असतात. तर यांचे कान लांब असतात खाली झुकलेली असतात.

 

 

  • कच्छ शेळी:

या शेळ्या गुजरात मध्ये आढळतात. या शेळ्या दूध अधिक देतात. त्यामुळे या शेळ्यांची मागणी जास्त असते. या शेळ्यांचा आकार मोठा असतो तर अंगावरील केस लांब आणि नाक उंच असतं. या  शेळ्यांची शिंगे मोठी आणि अणकुचीदार असतात.

 

  • गद्दी शेळी:

हिमाचल प्रदेशात आढळणारी शेळी असून पश्मिनासाठी या शेळ्या पाळल्या जातात. या शेळ्यांचे कान आठ ते दहा सेंटिमीटर लांब असतात. या शेळ्यांचे शिंगे टोकदार  असतात. हिमाचल प्रदेशातील कुलू घाटीत वाहतुकीसाठी यांचा उपयोग होतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters