1. पशुसंवर्धन

शेळीपालन करत असाल तर; काळजी घ्या हे दोन रोग ठरू शकतात शेळीसाठी घातक

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
goat farming

goat farming

शेळीपालन हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक उत्पन्नाचे अतिक्त्त साधन म्हणुन काम करते. अनेक शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यात शेळीपालन एक महत्वाची भूमिका बजावते. शेळीपालनात जर यशस्वी व्हायचे असेल तर, शेळीचे आरोग्य जोपासणे खुप महत्वाचे ठरते.आज आपण शेळीला होणारे दोन गंभीर रोगांची लक्षणें व त्यावरील उपचार जाणुन घेऊया.

शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचाच सौदा आहे, परंतु काही वेळा शेळ्या किंवा त्यांची करडे रोगांना बळी पडतात, ज्यामुळे शेतकरी पशुपालकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. या रोगांना वेळीच ओळखले तर शेळीचे प्राण वाचू शकतात.

आज आम्ही आपणांस, शेळ्यांना होणाऱ्या दोन रोगांची लक्षणे आणि उपचारांबद्दल सांगत आहोत. केंद्रीय शेळी संशोधन संस्था मखदूम, फराह, मथुरा यांनी ही माहिती दिली आहे.

पीपीआर (बकरी प्लेग)

हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्गजन्य आहे आणि शेळ्यांमध्ये साथीच्या रोगासारखा पसरतो. जर कळपात हा आजार शिरला तर कळपातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त शेळ्यांना संसर्ग होऊ शकतो आणि मृत्यू दर 50-90 टक्के इतका जास्त असू शकतो.

 लक्षणे

»ह्या रोगांची लागण झालेल्या शेळीमध्ये खुप जास्त ताप येतो जवळपास  2060 फॅरेनहाइट इतका ताप शेळीला चढतो.

»नाकातून पाणी येते आणि तोंडात, ओठांवर आणि जिभेवर फोड बनतात.

»ह्या लागण झालेल्या बकरीमध्ये काळ्या रंगाचे अतिसार आणि निमोनिया होतो ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.

जेव्हा रोग खुप पसरतो तेव्हा उपचार फारसे प्रभावीपणे काम करत नसतात, परंतु लक्षणांवर आधारित अजून जास्त संसर्ग होऊ नये म्हणुन जिवाणूस प्रतिबंध करणाऱ्या औषधांच्या स्वरूपात अँटीबायोटिक्स दिली जाऊ शकतात आणि बी-कॉम्प्लेक्स सुया आणि अतिसार विरोधी औषधे सहायक उपचार म्हणून दिली जाऊ शकतात.

4 महिने वयाच्या करडामध्ये आणि सर्व प्रौढ शेळ्यांमध्ये हा रोग PPR लसीद्वारे बरा होतो.  त्याची लस भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली (यूपी) येथे उपलब्ध आहे.

 गोट पॉक्स

गोट पॉक्स रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे जो शेळ्यांच्या सर्व वयोगटात होतो परंतु लहान करडांणा याचा जास्त त्रास होतो.

 लक्षणे

»ह्या रोगात गोट पॉक्सचे पुरळ/पुरळ प्रामुख्याने शरीराच्या त्वचेवर, प्रामुख्याने कान, ओठवर आढळतात.

»डोळे, नाक आणि तोंडातून पाण्याचा स्त्राव होतो.

»श्वास घ्यायला त्रास आणि न्यूमोनियाची इतर लक्षणे दिसतात.

»या आजारात मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे.

»शरीरावर शेळीमध्ये होणाऱ्या कांजण्याचे पुरळ येतात.

 

प्रतिबंध

रोगापासून बचाव करण्यासाठी गोट पॉक्सची लस दिली जाते. सुरुवातीची लस (1 मिली) तीन ते चार महिन्यांच्या वयाच्या करडाणा त्वचेखाली दिली जाते. मग ही लस दरवर्षी द्यावी लागते. शेळ्यामध्ये हा आजार रोखण्यासाठी मेंढ्यांमधील शीप पॉक्सची लस दिली जाऊ शकत नाही.

 रोग टाळण्यासाठी, आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे ठेवले पाहिजे.

आजारी शेळ्यांचे राहण्याचे ठिकाण स्वच्छ आणि हवेशीर असावे.

त्वचेच्या खुर जाळून टाका किंवा खड्ड्यात पुरून टाका.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters