शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकरी बांधव अनेक शेतीशी निगडित व्यवसाय करतात अशाच एका व्यवसायापैकी आहे बकरीपालन अर्थात शेळीपालनचा व्यवसाय. ह्या व्यवसायाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय कमी भांडवलात सुरु करता येतो. शेळीपालन करून अनेक पशुपालक शेतकरी चांगली कमाई करत आहेत. जर आपणही शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास आपल्यासाठी आहे आज आपण शेळीच्या अशा दोन सुधारित जातीविषयी जाणुन घेणार आहोत ज्याचे पालन करून आपण लाखो रुपयांचे उत्पन्न सहज कमवू शकतात. चला तर मग जाणुन घेऊया ह्या बकरीच्या दोन जातीविषयी.
शेळीची दुम्बा जात - हि शेळीची जात भारतात उत्तर प्रदेश राज्यात मोठ्या संख्येत पाळली जाते. ह्या शेळीची शेपटी हि आकाराने गोल, चपटी आणि मोठी असते. ह्या जातीच्या शेळीच्या शेपटीचे वजन हे खुप अधिक असते. ह्या शेळीची बकरी ईदच्या वेळी अधिक मागणी असते. शेळीची दुम्बा हि जात 7 महिने ते 1 वर्षाच्या दरम्यान करड्याना जन्म देऊ शकते.
दुम्बा जातीच्या पहिल्या 2 महिन्यांच्या करड्याचे वजन 25 किलो पर्यंत असते. हि जात दिसायलाही खूप सुंदर असते. ह्या जातीच्या बकरीच्या ह्या वैशिष्ट्यामुळे बाजारात यांना चांगला भाव देखील मिळतो. याच्या दोन महिन्यांच्या करडांची किंमत 30 हजार रुपयांपर्यंत असू शकते. तसेच 3 ते 4 महिन्याच्या करडांची किंमत हि जवळपास 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
उस्मानाबादी शेळी-ही जात महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते, म्हणून ह्या शेळीला उस्मानाबादी असे नाव पडले असावे असे सांगितले जाते. ह्या जातीच्या शेळीचे पालन करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकतात. हि जात दूध आणि मांस अशा दोन्ही उत्पादनसाठी पाळली जाते. ही शेळी अनेक प्रकारच्या रंगात आढळते. ह्या जातीच्या प्रौढ नरचे वजन सुमारे 34 किलोपर्यंत असू शकते आणि मादी शेळीचे वजन 32 किलोपर्यंत असू शकते. शेळीची ही देशी जात दररोज 0.5 ते 1.5 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम असते. उस्मानाबादी शेळी सर्व प्रकारचा चारा खाते. ह्या दोन्ही जातींच्या शेळींचे पालन करून लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित केले जाऊ शकते.
Share your comments