एका बाजुला देशात नोकरीसाठी दररोज धावपळ करणारे युवक आहेत तर काहीजण आपल्या भविष्यासाठी स्वत: मार्ग तयार करत असतात. स्वत:चा व्यवसाय सुरू करतात, तर काहीजण शेती किंवा त्याच्याशी पुरक असलेला पशुव्यवसाय सुरू करत असतात, त्यातील एक व्यवसाय म्हणजे शेळीपालन. मांसाहाराची वाढती मागणी पाहता शेळीपालनाला महत्त्व वाढत आहे.
हीच कास पकडून मध्यप्रदेशातील भोपाळमधील तीन मित्रांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून चक्क शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. मटनाची वाढती मागणी पाहता मोठं-मोठी पदवी घेतलेले लोक या शेळीपालनाच्या व्यवसायात उतरत आहेत. दरम्यान आज आपण भोपाळमधील या तीन मित्रांची कहाणी पाहणार आहोत... हेमंत माथुर, प्रवीण गुप्ता, सुनील वर्मा हे पेशेने इंजिनिअर आहेत. 2012 या वर्षी हे तिघे जण एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते.या तिघांनी नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केला. यांनी गोकूल एग्रोनोमिक्स कंपनी बनवून स्वत:शेळीपालन करत आहेत. ज्या लोकांना शेळीपालन करायचे आहे. त्यांना ते प्रशिक्षण देखील देत आहेत. इतर शेतकऱ्यांना गोकूलशी जोडून शेळीपालनाला प्रोत्साहन देत आहेत.
दोन लाख रुपयांमध्ये सुरू केला शेळीपालनाचा व्यवसाय
दरम्यान ज्यांना शेळीपालन करायचे असते, त्यांचा पहिला हाच प्रश्न असतो कि शेळीपालनासाठी सुरुवातीला किती रुपये खर्च करावे लागतात. आज आपण या तीन मित्रांच्या गोकूल एग्रोनिमिक्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांना किती रुपये लागले याची माहिती घेऊ... या तिन्ही मित्रांनी एका छोट्या जागेत एक लाख रुपयांची गुंतवणूक करून शेळीसाठी शेड बनवले. त्यनंतर एक लाख रुपयांच्या शेळ्या घेतल्या आणि शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान आता हा व्यवसाय साधरण एकर एकरात पसरला आहे. शेळीपालनात नुकसान होण्याची शक्यता तेव्हा असते जेव्हा आपण शेळ्याच्या आरोग्यकडे लक्ष देत नाही.
हेही वाचा : शेळीपालन करायचंय पण पैसा नाही? असं असेल तर, डोन्ट वरी तुमच्यासाठी ह्या बँका देतायेत लोन जाणून घ्या
शेळ्याच्या आरोग्यसाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यामुळे शेळ्याना संतुलित आहार देणं गरजेचे असते. या तिन्ही मित्रांनी तेच केलं. शेळ्याच्या चांगल्या आहारासाठी लक्ष केंद्रीत केलं. यासाठी त्यांना प्रतिदिवस 20 रुपयांचा खर्च येऊ लागला.
शेळीपालनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाळण्यासाठी कोणत्या प्रकारची शेळी घेत आहोत. दरम्यान भोपाळ मधील हे तीन्ही मित्र बीटल, सिरोही बारबरी आणि सोजट जातीच्या शेळ्या पाळत आहेत.
कोणकोणत्या बँका देतात बरं शेळीपालनासाठी लोन
1.एसबीआय
नाबार्ड पण खाली दिलेल्या बँकेच्या माद्यमातून लोन देते
»व्यापारी बँक
»प्रादेशिक ग्रामीण बँक
»राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक
»राज्य सहकारी बँक
»अर्बन बँक इ.
3.कॅनडा बँक
4.आयडीबीआय बँक
5.शेळीपालनासाठी मुद्रा लोन पण मिळतं
Share your comments