जर आपण मत्स्यपालनाचा विचार केला तर बरेच तरुण शेतकरी आता मत्स्यशेतीकडे वळू लागले आहेत. कारण शेतीला पूरक जोडधंदा म्हणून याचा समावेश केला जातो. बरेच शेतकरी आता शेतामध्ये शेततळ्यांचा वापर मत्स्यशेतीसाठी करतात. मत्स्यशेतीच्या माध्यमातून अनेक जणांना स्वयंरोजगाराचा एक खात्रीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
परंतु आपल्याला माहिती आहेच की शेतामध्ये तलाव उभारून त्यात मासे पाळले जातात. परंतु तलावा शिवाय मत्स्यपालन शक्य असून बायॉफ्लोक तंत्रज्ञान याबाबत तुम्हाला मदत करू शकते.
नक्की वाचा:Goat Species: 'कोकण कन्याळ' देईल शेळीपालनात यशाची समृद्धी, वाचा या शेळीची माहिती
काय आहे नेमके बायॉफ्लॉक तंत्रज्ञान?
या तंत्रज्ञानाच्या साह्याने तुम्ही तलावाशिवाय माशांचे संगोपन करु शकतात. या तंत्रज्ञानामध्ये मत्स्यपालन एका टाकीमध्ये केले जाते.
एक आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धत असून यामध्ये टॅंक पद्धतीचा अवलंब करून त्यामधील बॅक्टेरिया च्या मदतीने माशांची विष्ठा आणि अतिरिक्त पदार्थ हे पेशीमध्ये रूपांतरित केले जातात याचा उपयोग टाकीमध्ये असलेले मासे त्यांच्या खाण्यासाठी उपयोग करतात.
त्यामुळे सहाजिकच माशांसाठी जे काही खाद्य लागते त्यामध्ये बचत होते. या तंत्रज्ञानाच्या साह्याने तुम्ही कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त माशांचे उत्पादन घेऊ शकतात. या तंत्रज्ञानाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनेक माशांच्या जाती एकाच वेळी पाळल्या जाऊ शकतात.
बायॉफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे
हे तंत्रज्ञान तलाव तंत्रज्ञानापेक्षा अतिशय स्वस्त आणि फायद्याचे आहे. तलाव बांधणीसाठी जास्त जागेची आवश्यकता असते मात्र त्या तुलनेत बायॉफ्लोक तंत्रज्ञानात पाण्याची टाकी बनवली जाते व त्यामध्ये मत्स्य पालन केले जाते.
या तंत्रज्ञानामध्ये सिमेंट टाकी, वायूविजन प्रणाली तसेच विजेची उपलब्धता, प्रोबायोटिक्स आणि मत्स्यबीज याची आवश्यकता असते. जर आपण तलावाचा विचार केला तर यामध्ये सघन मत्स्यपालन होऊ शकत नाही कारण यामध्ये अमोनिया वाढतो.
तलाव अस्वच्छ झाल्यास माशांची मर वाढते. एवढेच नाहीतर बाहेरील पक्षी मासे खातात त्यामुळे नुकसान होते. या तंत्रज्ञानामध्ये टँकवर शेड तयार केले जाते त्यामुळे मासे मरत नाही नाही आणि बाह्य पक्षांकडून माशांचे नुकसान देखील होत नाही. तसेच एक हेक्टर तलावात दोन इंच बोअरच्या
माध्यमातून नेहमी पाणीपुरवठ्याची सोय केली जाते. परंतु त्या तुलनेत बायॉफ्लोक या तंत्रज्ञानात चार महिन्यातून फक्त एकदाच पाणी भरले जाते. समजा जर पाण्यात घाण साचली तर दहा टक्के पाणी काढून ते स्वच्छ करता येते.
या तंत्रज्ञानाचे आर्थिक गणित
यामध्ये तुम्ही जि टाकी बनवाल तिचा खर्च हा टाकीचा आकारावर अवलंबून असते. टाकीचा आकार इतका मोठा असतो ती माशांची वाढ चांगली आणि उत्पन्नदेखील चांगली होते. जर आपण या क्षेत्रातील जाणकार लोकांचा विचार केला तर त्यांच्या मतानुसार एक टॅंक बनवण्यासाठी 28 ते 30 हजार रुपये खर्च येतो.
यामध्ये सगळ्या प्रकारची उपकरणे आणि लागणारी मजुरी इत्यादी समाविष्ट आहे. यामध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या तुम्ही टाकी बनवली तर त्यासाठी 32 हजार रुपये खर्च येतो परंतु तो एकाच वेळी करावा लागतो. या माध्यमातून सहा महिन्यात साडे तीन क्विंटल मासे तयार होतात.
जर आपण अंदाजीत विचार केला तर या माध्यमातून 24 हजार रुपये खर्च सहा महिन्यासाठी येतो. परंतु यामध्ये तुम्ही चाळीस हजार रुपये किमतीचे मत्स्य उत्पादन करू शकतात. म्हणजे आपण एका टाकीच्या माध्यमातून वर्षाला 25000 रुपये निव्वळ नफा मिळवू शकतो.या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही देशी मागूर,कोई कार्प,पाबडा तसेच कॉमन कार्प इत्यादी माशांचे पालन करू शकतात.
Share your comments