भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत शेळी संशोधन संस्थेने शेळीपालन मध्ये साहाय्यभूत ठरेल असे एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळीपालना विषयी सर्वंकष माहिती मिळेल.
शेळ्यांच्या उपयुक्त जाती, शेळीपालना विषयी असलेले शासकीय योजना इत्यादी देखील याद्वारे माहिती मिळते. केंद्रीय केळी संशोधन संस्थेने (CIRG) शेळीपालन अँप तयार केले आहे.शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हे मोबाईल ॲप महत्त्वपूर्ण ठरू शकते.
या मोबाईल ॲप्लिकेशन चे शेळीपालनातील फायदे…..
- शेळ्यांच्या विविध जाती- या मोबाईल ॲप मध्ये भारतीय शेळ्यांच्या जाती बद्दल खूप सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जर तुम्हाला शेळी फक्त मांसासाठी ठेवायचे असतील तर तुम्ही कोणत्या जाती निवडाव्यात किंवा कोणत्या जाती दुधासाठी अधिक चांगले असतील याची सुद्धा विश्लेषण आहे.
- कृषी उपकरणे आणि चारा उत्पादन- शेळीपालनात कोणत्या कृषी उपकरणाची गरज आहे किंवा चारा कसा तयार करावा याची देखील माहिती या मोबाइल ॲप मध्ये देण्यात आली आहे. चारा उत्पादनासाठी आणि शेती तयार करण्यासाठी कोणती उपकरणे महत्त्वाचे आहेत याची देखील माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
- शेळ्यांचे आरोग्य विषयी माहिती- या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करावी याची देखील व्यवस्थित माहिती सांगण्यात आली आहे.
- तसेच या ॲपच्या मदतीने शाळेमध्ये होणाऱ्या सामान्य रोगांचे लक्षण विषय देखील माहिती मिळू शकते.अशा रोगांना रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना करणे शक्य होते.
- एप्लीकेशन कसे आणि कुठे मिळवायचे?- हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जावे व त्यानंतर CIRG Goat Farming असे टाईप करावे. त्यानंतर ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे. एप्लीकेशन हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध आहे.
Share your comments