आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामीण भागात बंधारे व गावतळीअसतात. अशा तळ्यांचा उपयोग प्रामुख्याने कपडे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो.
या अशा प्रकारच्या जलशांचा वापर त्यांच्या प्रमुख हेतूला हात न घालता मत्स्यशेतीसाठी करता येणे शक्य आहे. ग्रामीण भागातील जनतेला मच्छ शेतीमुळे एक प्रकारचे पोस्टीक अन्न तर मिळतेच परंतु बेरोजगारांना चांगला रोजगार देखील मिळतो. मत्स्य शेती यशस्वी होण्यासाठी कोणत्या माशांच्या जाती अधिक फायदा देणारे ठरतील हे ही माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण मत्स्य संवर्धनासाठी उपयुक्त जातींची माहिती घेऊ.
मत्स्य संवर्धनासाठी योग्य जाती
1- काटला - या जातीच्या माशाचे डोके मोठे आणि रुंद असते. हा मासा पृष्ठभागावर वावरणारा असतो व त्याच्या अंगावर खवले असतात. तोंड बाजूला वळलेली असते म्हणून पृष्ठ भागाकडील अन्न खाणे त्याला सोपे जाते. खालचा ओठ जाड असतो. साधारण वर्षाला एक ते दीड किलो पर्यंत वाढतो. या जातीच्या माशा चे वैशिष्ट्य म्हणजे इतर कार्पच्या तुलनेत झपाट्याने वाढतो.
2- रोहू- या माशाचे शरीर लांबट असते व अंगावर खवले असतात. मासा पाण्याच्या मधल्या थरातील अन्न खातो. त्यांच्या ओठाची किनार दातेरी असते.तिचा उपयोग वनस्पती ओढून तोडण्यासाठी होतो. याची सुद्धा वाढ वर्षाला साधारणपणे एक किलोपर्यंत आहे.
3- मृगल- कटला व रोहू नंतर मत्स्य शेती साठी वापरला जाणारा कार्प म्हणजे मृगल या माशाचे तोंड रुंद व ओठ पातळ असतात. तळाच्या चिखलातील सेंद्रिय पदार्थ शेवाळ, प्लवंग हे त्यांचे खाद्य आहे.हा साधारणपणे वर्षाला 600ग्रॅमपर्यंत वाढते. हे तिन्ही प्रकारचे मासे संवर्धनासाठी वापरले तर निश्चितच अधिक उत्पादन मिळू शकते. कारण हे पाण्याच्या तिन्ही भागात चांगल्या प्रकारे वाढतात.
4- कोळंबी- मुख्यता तळाशी वावरणारी कोळंबी मस्तकाचा रोसस्ट्रम पुढे वाढलेला असतो. या कोळंबीच्या उपयोग गोड्या पाण्यातील संवर्धनाकरिता करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा वर्षापासून महाराष्ट्रातील लोक गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन विषयी जागरुक झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण जमिनीचा विचार केला गेला तर पश्चिम महाराष्ट्रातील उसामुळे ज्या जमिनीची उत्पादन क्षमता घटलेली आहे. अशा जमिनीचा उपयोग वरील सर्व बाबींचे व्यवस्थित व्यवस्थापन करून मत्स्यसंवर्धनासाठी फायद्याचे ठरते.
5- सायप्रिनस काप्रियो-बहुतेक संवर्धनासाठी हा मासा वापरण्यात येतो.याच्यात तीन पोटजाती आहेत हा मासा जास्त प्रमाणामध्ये तळाशी असणारे कीटक,कुजणाऱ्या वनस्पती अन्न म्हणून उपयोगात आणतो.
हा भारतात सर्वत्र सापडतो.
महत्वाच्या बातम्या
Share your comments