सध्याचे जीवन हे खूप धावपळीचे आणि धकाधकीचे आहे. जीवन जगत असताना कामाचा प्रचंड ताण, अतिशय व्यस्त जीवनशैली यामुळे बरेचदा नैराश्य किंवा तनाव निर्माण होतो. या समस्यांच्या अनुषंगाने शोभिवंत मत्स्यपालनाचे एक खूप मोठे आकर्षण भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढलेली आहे. विकसित देशांप्रमाणे विकसनशील देशांमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील लोकांना रोजगार म्हणून शोभिवंत मत्स्यपालन एक चांगली संधी आहे. या लेखामध्ये शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाविषयी माहिती घेऊ.
शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती
अ) इनडोअर युनिट-
1- जर तुम्ही या माध्यमातून शोभिवंत मत्स्यपालन सुरू केले तर तुम्हाला घरातील एका छोट्या खोलीत मध्ये सुद्धा मत्स्य संवर्धन करता येते.
2- या प्रकारात तुम्ही विविध आकाराच्या काचेच्या टाक्यांमध्ये मत्स्यबीज उत्पादन करू शकता.
3- इनडोअर युनिटमध्ये ज्या मत्स्यप्रजाती जास्त किंमत मिळवून देतील त्यांचे बीजोत्पादन करणे योग्य आहे.
नक्की वाचा:Prawn Fish Farming व्यवसायातून मिळेल लाखोंची कमाई, अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय
आ) यार्ड स्केल युनिट-
1- या प्रकारात तुम्ही घरातील अंगणामध्ये मत्स्य संवर्धन करू शकतात. यासाठी तुम्हाला एक हजार ते दोन हजार चौरस फूट जागा आवश्यक असते.
2- जोपर्यंत मत्स्यबीजाचा आकार विक्रीयोग्य होत नाही तोपर्यंत त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे असते.
3-बाजारामध्ये मध्यम किमतीत मिळणारे मासे जसे की, गोल्ड फिश, एंजल, गुरामी, टेळा यांचे संवर्धन करण्यासाठी हे युनिट योग्य ठरते.
इ)- सिमेंट पॉईंट युनिट:-
1- सिमेंटचे विविध आकाराचे तळे उभारून त्यामध्ये तुम्ही मत्स्यबीजचे संगोपन करु शकतात.
2- यार्ड स्केल युनिटपेक्षा थोडी मोठी जागा असल्यास तुम्ही या प्रकारचे युनिट बांधून संगोपन करू शकतात.
3- हा युनिट तुम्ही पाच हजार चौरस किमी पर्यंत बांधू शकतात.
4- हा युनिट बांधण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त खर्च लागेल मात्र यामध्ये संगोपन झाल्यास तुम्हाला चांगले उत्पादन मिळेल.
नक्की वाचा:Bussiness Idea: नासलेल्या दुधाचा असाही करा उपयोग, बनवा 'हे' दोन पदार्थ अन कमवा भरपूर नफा
ई) प्लास्टिक अस्तरीकरण तलाव युनिट:-
1- यासाठी पाच ते दहा गुंठे पडीक जमीन व पाण्याचा स्त्रोत असेल तर हे युनिट सहज तयार होऊ शकते.
2- जागेचा आकार पाच ते दहा मीटर लांब× दीड ते दोन मीटर रुंद×1.2 मीटर खोल असा तलाव तयार करून घ्यावा व त्यामध्ये 250 ते 350 मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करावे.
3- विरुद्ध दिशेने पाणी जाण्यासाठी पाईपलाईन करून घ्यावी.
4- तलावातील मासे यांना संरक्षण मिळण्यासाठी पूर्ण युनिटवर शेडनेट करून घ्यावे.
या व्यवसायातील अजून पर्याय
1- शोभिवंत माशांची पिल्ले योग्य आकारात वाढवून त्यांची विक्री
2- नर व मादीची प्रजनन क्षमता तयार करून त्यांची विक्री करावी.
3- प्रजनन करिता जिवंत खाद्य निर्मिती करून विक्री करावी.
4- कार्यालय व हॉटेल्समध्ये छंद असणाऱ्या ग्राहकांना सेवा पुरवणे.
नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!
Share your comments