शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.आता पोल्ट्री चा व्यवसाय म्हटला म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या दृष्टिकोनातून पोल्ट्री एक मोठी इंडस्ट्री म्हणून पुढे येत आहे. बरेच सुशिक्षित तरुण पोल्ट्री व्यवसाय कडे वळत आहेत.
तसे पाहायला गेले तर पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांचे विविध प्रकारचे जाती असतात. परंतु यामध्ये कडकनाथ कोंबडी पालन खूपच फायदेशीर आणि जास्त नफा देणारे ठरेल. यामध्ये कडकनाथ अंडी उत्पादन व्यवसाय आणि
कडकनाथ चिकन उत्पादन व्यवसायहे दोन्ही खूप चांगली आणि कमी गुंतवणुकीचे स्टार्टअप आहेत. गेल्या दशकाचा विचार केला तर पोल्ट्री उद्योगात प्रचंड विकास झाला आहे.भारतामध्ये देशी कोंबड्यांच्या एकोणवीस जाती आहेत, यापैकी कडकनाथ कोंबडी एक जात आहे.
आपल्याकडे परसबागेतील कुक्कुटपालन हा प्रकार देखील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलूंवर स्पर्श करणाऱ्या विशिष्ट ग्रामीण कुटुंबाचा एक भाग आहे. या लेखात आपण कडकनाथ कोंबडी पालन केल्यास मिळणारा फायदा जास्त असतो परंतु यामागील कारणे काय आहेत हे समजून घेऊ.
नक्की वाचा:बोअर शेळी पाळा अन शेळीपालनात मिळवा भक्कम आर्थिक स्थैर्य, जाणून घ्या बोअर शेळीचे वैशिष्ट्य
कडकनाथ कोंबडीचे प्रमुख वैशिष्ट्ये
1- कडकनाथ ही भारतातील एक महत्त्वाचे देशी कोंबडीची जात आहे.
2- याला हिंदीमध्ये कालामाशी असे म्हणतात. ही गडद रंगाच्या मांसासाठी लोकप्रिय आहे ज्याला ब्लॅक मीट चिकन असेही म्हणतात.
3- कडकनाथ ही भारतातील दुर्मिळ कुकुट जातींपैकी एक असून तीमुळे मध्य प्रदेश राज्यातील झाबुवा जिल्ह्यातील आहे.
4- कडकनाथ कोंबडीची जात त्याच्या मांसाची गुणवत्ता, पोत आणि चव यासाठी प्रसिद्ध आहे.
5-कडकनाथ कोंबडीचे मांस काळ्या रंगाचे आणि अंडे तपकिरी रंगाचे असतात.
6- ब्लॅक मीट चिकनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि उत्कृष्ट औषधी गुणधर्मांमुळे भारतातील बहुतेक राज्यांमध्ये पसरली आहे.
7- हे पक्षी विशेषता होमिओपॅथीमध्ये खूप औषधी मूल्य असलेले मानतात. विशिष्ट मज्जासंस्थेच्या विकारावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.
8- कडकनाथ कुकुट पालनाचा व्यवसाय प्रमाण विशेषतः केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये आहे.
नक्की वाचा:दुग्ध व्यवसायात फायद्याच्या आहेत 'या' 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई, वाचा सविस्तर माहिती
ब्लॅक मीट कोंबडीच्या जाती
कुक्कुटपालन हा भारतातील एक मोठा उद्योग आहे आणि त्याचे मुख्य लेयर आणि ब्रॉयलर यामध्ये वर्गीकरण केले जाते. जे अंडे आणि मांसाचे उत्पादन करते.
काळ्या मांसाच्या चिकनच्या अनेक जाती जगभरात पसरले आहेत.त्यापैकी कडकनाथ ही भारतात, सिल्कीअर चीनमध्ये तर अय्याम सेमानी इंडोनेशियात आढळते.
कडकनाथ कोंबडीला एवढी मागणी का?
कडकनाथ की कठोर जात आहे म्हणून ती सर्व हवामान परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे.तसेच तिच्यामध्ये उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असते.
या कोंबडीच्या मांसाच्या विशिष्ट चव आणि पोतसाठी सर्वत्र पसंती आहे. या जातीचे मांस काळ्या रंगाच्या असून त्याचे उत्कृष्ट औषधी मूल्य असल्याचे मानले जाते. आदिवासी मध्ये खूप लोकप्रिय आहे.
कडकनाथ कोंबडीची अंड्याचे महत्त्व
1- या कोंबडीची अंडी वृद्ध लोकांसाठी आणि वाढत्या मुलांसाठी चांगले आहेत. यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर आणि कोलेस्ट्रॉल कमी आहे.
2- कडकनाथ अंडी मायग्रेन, बाळंतपणानंतर होणारी डोकेदुखी, मूत्रपिंडाची तीव्र आणि जुनाट जळजळ, दमा इत्यादी वर उपचार करण्यास मदत करतात.
कडकनाथ कोंबडीचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म
1- कडकनाथ मध्ये प्रोटीन चे प्रमाण भरपूर असते.
2- कोंबडीच्या इतर जातींमध्ये प्रथिने 18 ते 20 टक्के असतात तर कडकनाथ मध्ये 25 टक्के जास्त असतात.
3-संशोधनानुसार, कडकनाथ मध्ये कोलेस्ट्रॉल 73 टक्के कमी होते तर ब्रॉयलर चिकन मध्ये 13 ते 25 टक्के कमी होते.
4- कडकनाथ मध्ये अमायनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते.
5-कडकनाथ मधील खनिजे म्हणजे नियासिन, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्वे बी1, बी 2, बी 12, जीवनसत्व सी आणि ई मोठ्या प्रमाणात आहे.
6- कडकनाथ कोंबड्याचे मांस विविध रोगांवरील उपचारासाठी वापरले जाते.
7- कडकनाथचा रक्ताचा उपयोग आदिवासी जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी करतात.
कडकनाथ कोंबडीची किंमत
कडकनाथ कोंबडीची भारतातील किंमत 2000 ते 2500 पर्यंत आहे. तर चिकन ची किंमत 1000 रुपये प्रति किलो आहे.
Share your comments