शेतीला जोडधंदा म्हणून जसे शेतकरी पशुपालन आणि कुक्कुटपालन अलीकडील काळात शेळीपालन मोठ्याप्रमाणात केले जात आहे. या खालोखाल जोडधंदा पैकी मत्स्यपालन याकडे देखील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. आता मत्स्यपालन म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर शेतातील शेततळे व त्यामध्ये आपण करत असलेले मत्स्यपालन तेवढे डोळ्यासमोर येते.
परंतु या मत्स्यपालनाचे संबंधित तीन ते चार प्रकारचे व्यवसाय केले तर शेतकरी बंधूंना छान पैकी चांगला पैसा मिळू शकतो. या लेखांमध्ये आपण मत्स्यपालनाशी संबंधित काही व्यवसाय पाहू.
नक्की वाचा:Goat Rearing: पाळाल 'या' दोन प्रजातीच्या शेळ्या तर नक्कीच मिळेल शेळीपालनात यश
मत्स्यपालनातील नामी संधी
1- मत्स्यखाद्य उत्पादन- मत्स्यपालनासाठी माशांना खायला खाद्य लागते हे आपल्याला माहिती आहे. मत्स्यपालनातील एकूण खर्चाच्या 60 टक्के खर्च हा मस्य खाद्यावर होतो.
मासे संवर्धनाची घनता जास्त असल्यामुळे अशा परिस्थितीत खाद्य महत्त्वाची भूमिका पार पाडते. माशांचे वेगवेगळे प्रकार व वाढीच्या अवस्था यानुसार वेगवेगळ्या आकारात खाद्य तयार करता येते. त्यामुळे खाद्य उत्पादन हे एक स्वयंरोजगाराचे चांगले साधन व यामध्ये चांगली संधी आहे.
2- एक्वा क्लीनिक- जसे पशुपालना मध्ये पशूंच्या संबंधित आरोग्याच्या समस्या उद्धवते, अगदी त्याप्रमाणेच माशांवर देखील उपचार आणि पाणी, मातीच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी एक्वा क्लीनिक उभारण्यासाठी एक मोठी संधी या क्षेत्रात उपलब्ध आहे.
एक्वा क्लीनिक उघडण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी जागा आणि सामू मीटर/पेपर,डिओ टेस्टिंग किट, अमोनिया टेस्टिंग किट, थर्मामीटर आणि काही केमिकल्स इत्यादी सारख्या गोष्टींची आवश्यकता लागते.
नक्की वाचा:Prawn Fish Farming व्यवसायातून मिळेल लाखोंची कमाई, अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय
3- मत्स्यव्यवसाय विषयक सल्ला आणि सेवा- मत्स्य व्यवसायाची संबंधित अनेक गोष्टी असतात जसे की मत्सरोगनिदान आणि उपचार, मत्स्यपालन व्यवसायातील तंत्रे,
गुणवत्ता व्यवस्थापन तसेच माशांना द्यायच्या खाद्याचे व्यवस्थापन इत्यादी बाबत मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे यामध्ये अभिप्रेत असते. पदवीधर अशा प्रकारचे सल्लागार युनिट सुरू करू शकता.
4- माशापासून मूल्यवर्धित उत्पादने- मत्स्यपालन व्यवसायाच्या माध्यमातून माश्यापासून विविध प्रकारची मूल्यवर्धित उत्पादने बनवता येतात. त्यामध्ये लोणचे, फिश वडा, फिश पापड, चकली, फिश कटलेट, फिश समोसा इत्यादी मूल्यवर्धित उत्पादने या माध्यमातून बनवता येतात. मूल्यवर्धित उत्पादने लहान स्तरावर माशापासून तयार केले जाऊ शकतात तसेच ते बराच कालावधी पर्यंत साठवता येऊ शकतात.
नक्की वाचा:कशाला कुक्कुटपालनाचा सोस! करा 'हा' पर्यायी व्यवसाय, नक्कीच मिळेल भरपूर नफा
Share your comments