पशुपालन हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात, त्यातल्या त्यात पशुपालनामध्ये शेळी आणि मेंढीपालन हे खर्चाच्या दृष्टीने स्वस्त आणि अधिक उत्पन्नाचे साधन असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतकरी जोडधंदा म्हणून शेळी-मेंढी पालनाचा पर्याय निवडतात. पण पावसाळ्यात मात्र शेळीपालकांची चिंता वाढत असते. कारण पावसाळा सुरू झाला तर शेळ्या मेंढ्यांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात रोगराईचा फैलाव झालेला दिसून येतो. या सगळ्या आजारांमध्ये आंत्रविषार आजार धोकादायक आहे. पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसायला लागते. हे कोवळे गवत जर शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर प्रमाणात खाल्ले तर आंत्रविषार आजार होतो.
लहान कोकरांना, करडांना जास्त दूध पाजणे, अति कर्बयुक्त पदार्थ म्हणजे मका, गहू, ज्वारी इत्यादी जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास या आजाराचे लक्षणे दिसायला लागतात. या आजाराची प्रमुख लक्षणांमध्ये करडे व कोकरे निस्तेज दिसतात, ते व्यवस्थित प्रमाणात दूध पीत नाहीत एका जागेवरच बसून राहतात. संडास होताना ती हिरव्या पातळ रंगाचे होते. तोंडाला फेस येतो, बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात त्यांना चक्कर आल्यासारखे होते. मोठ्या शेळ्या-मेंढ्या 24 तासांपर्यंत राहतात व त्यांच्यामध्ये तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात. हा आजार जडल्यानंतर शेळीपालकांनी काय उपाय केले पाहिजे.
उपचार हा आजार अल्प मुदतीचा असल्यामुळे त्याच्यावर प्रभावी उपचार पद्धती नाही. परंतु पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत, लिव्हर टॉनिक द्यावे त्याच्यामुळे होते असे की पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते. कोवळे लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये लहान लहान कोकरांना करडांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. तसेच अति कर्बयुक्त पदार्थ( ज्वारी, मक्का इत्यादी) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. गाभण शेळ्या-मेंढ्यांना पशुतज्ज्ञांकडून योग्य कालावधीत आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे.
Share your comments