शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात.पशुपालना मध्ये गाय,म्हैस इत्यादी दूध देणाऱ्या पशूंचे संगोपन केले जाते. परंतु पशुंचे दूध उत्पादन क्षमताही बऱ्याच अंशी त्यांच्या जातीवर देखील अवलंबून असते.
वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळ्या प्रकारचे असते.तसेच दूध उत्पादन क्षमता ही संतुलित आहार,जनावरांच्या आरोग्य इत्यादी बाबींवर देखील अवलंबून असते. आपल्याकडे पशुपालनासाठी म्हैस पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार नागपुरी,पंढरपुरी,बन्नी, मुरा, निली रावी,जाफराबादी, चिल्का,गोदावरी इत्यादी प्रकारच्या जवळ जवळ 26 प्रकारच्याम्हशीचा पाठपुरावा झाला आहे. या 26 पैकी जवळजवळ बारा नोंदणीकृत जातीआहेत. या लेखात आपण म्हशींच्या काही उपयुक्त आणि जास्त दूध देणाऱ्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत.
या आहेत म्हशीच्या जास्त दूध देणाऱ्या जाती
- सुरतीम्हशी- ही जात गुजरातमधील खेडा व बडोदा येथे आढळते.तिचा रंग भुरा,सिल्वर सलेटी किंवा काळा असतो. त्या मध्यम आकाराचे असताततसेच त्यांचे धड आणि डोके लांब असते.त्यांची शिंगे विचित्र आकाराचे असतात. या जातीची दूध देण्याची उत्पादन क्षमताही900 ते 1300 लिटर प्रति लिटर आहे. या जातीच्या म्हशीच्या दुधात 8 ते 12 टक्के चरबीचे प्रमाण आढळते.
- मेहसाना म्हशी-ही जात गुजरातच्या मेसाना जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या काही भागात आढळते.या म्हशीच्या जातीचा रंग काळा असतो. तर काही काळ्या व भुऱ्या रंगाच्या देखील असतात.
- त्यांचे शरीरमुरा जातीपेक्षा बरेच मोठे आहे.परंतु त्यांचे वजन त्यांच्यापेक्षा कमी आहे. या जातीच्या म्हशी चे सरासरी दूध उत्पादन दरवर्षी 1200 ते 1500 किलोपर्यंत असते.
- तोडा म्हशी-या म्हशीचेजातिच्या नावा आदिवासींच्या नावावर आहे. जे तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतीय प्रदेशात आढळतात. या जातीच्या शरीरावर एक जाड बालकोट आहे.त्यांची सरासरी उत्पादन क्षमता पाचशे ते सहाशे एक किलो ग्रॅम आहे. विशेष म्हणजे दुधात 8% चरबी आढळते.
- चिल्का म्हशी- मशीनची ही जात ओडिसा,कटक,गंजम, पुरी आणि खुर्दा जिल्ह्यात आढळते. ओडिसातील चिल्का तलावावरून या म्हशीला नाव देण्यात आले आहे.हेदेशी या नावानेदेखील ओळखले जाते. या जातीचा रंग तपकिरी काळा किंवा काळा आहे.हे मध्यम आकाराची असून दरवर्षी सरासरी उत्पादन क्षमता 500 ते 600 किलो उत्पादन मिळते.
Share your comments