सध्या देशात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गायींच्या योग्य संगोपणातून शेतकरी मोठा नफा मिळवत आहेत. काही गायींच्या जाती अशा आहेत ज्या भरपूर प्रमाणात दूध देतात. गायींचा योग्य प्रकारे सांभाळ केल्यास त्या गायी दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देवू शकतात. तसेच जास्त दूध देणाऱ्या गायींच्या संगोपण करून दुधाच्या व्यवसायातून शेतकरी महिन्याला लाखोंचा नफा मिळवू शकतात. सर्वात जास्त दूध गेणाऱ्या गायी कोणत्या आहेत, याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.
गीर गाय -
देशातील इतर गायींच्या तुलनेने या जातीच्या गायी दूध अधिक देत असतात. ही गाय दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देते. मात्र, या गायीची योग्य काळजी घेतल्यास ही गाय दररोज 50 ते 60 लिटर दूधही देऊ शकते. या गायीचे नाव गुजरातमधील गीर जंगलावरून पडले आहे. या जंगालात या गायी अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे या गायींचे नाव गीर म्हटले जाते. या गायींना देशात आणि विदेशात खूप मागणी आहे.
राठी गाय -
अगदी कमी आहारात या गायी जास्त दूध देतात. प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. जर समतोल आणि पौष्टिक आहार या गाईंना दिला तर 25 ते 30 लिटर पर्यंत या गाई दूध देतात.
साहिवाल गाय -
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये साहिवाल गायी अधिक आहेत. ही गाय दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र या गायीची योग्य काळजी घेतल्यास ती दररोज 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते. या गायीची जास्त जास्त काळजी घेण्याची गरज नसते. या गायीची सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ही गाय वासरुला जन्म दिल्यानंतर १० महिन्यापर्यंत दूध देत असते.
Share your comments