1. पशुसंवर्धन

शेळीपालन करताय का? मग हरनाली जातीच्या मेंढीचे करा पालन कमाई होईल लाखोंत

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
harnaali sheep

harnaali sheep

मानवी सभ्यतेची सुरुवातच शेती आणि पशुपालनापासून झाली, पण दुर्दैव आपण आधुनिकतेच्या महापुरात इतके भिजत गेलो की आपल्या आधुनिक उपक्रमांसमोर आपल्या आर्थिक उपक्रमांना क्षुल्लक समजण्याची चूक केली. त्याचाच परिणाम आहे की आज कोणत्याही शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे वाटत नाही, आणि कोणत्याही पशुपालन करणाऱ्या बापाला आपला मुलगा पशुपालक बनावे असे वाटत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या दोन्ही गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मजबुत पाया आहे आणि शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहचे एक महत्वाचे साधन आहे. म्हणुनच आज आपण जाणुन घेणार आहोत हरनाली मेंढीच्या जातीविषयी जे तुम्हाला नक्कीच चांगली कमाई करून देईल.

हरनाली मेंढीची विशेषता

जगात तसे तर मेंढ्यांच्या असंख्य जाती आहेत पण जगात अनेक मेंढ्या असल्या तरी हरनाली मेंढी इतर सर्व मेंढ्यांपेक्षा खूप वेगळी आहे.  तिची विशेषता, ओळख, गुणवत्ता ह्या गोष्टीं तिला इतर मेंढ्यांपेक्षा वेगळे करते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हर्नाली जाती तीन वेगवेगळ्या, देशी आणि विदेशी जातींपासुन तयार केली गेली आहे. हरनाली मेंढी ड्रेन, मेरिना आणि कॅरिडेल मेंढ्यांच्या जातीपासून तयार केली आहे. जरी, सुरुवातीला ते तीन मेंढ्यांच्या जातींपासुन तयार केली गेली होती, तरी नंतर त्यांची मागणी वाढली आणि ती पशुपालकांच्या पसंतीस खरी उतरली आणि तिची संतती स्वतःच वाढत गेली. तथापि, त्यांची संख्या अजूनही कमी आहे. सध्या ते फक्त हिसार आणि त्याच्या शेजारील प्रांतात आढळते, परंतु येत्या काही दिवसांत ते झपाट्याने वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या यावर संशोधनाची प्रक्रिया सुरू आहे. हरनाली मेंढी इतर मेंढ्यांच्या तुलनेत उच्च दर्जाची मानली जाते. हे मेरिनो मेंढीसारखे भरपूर लोकर देते. ह्या जातीच्या मेंढीच्या दुधाची गुणवत्ता देखील खूप चांगली मानली जाते.

हरनाली मेंढी कोठे आढळते?

जरी मानवी सभ्यतेच्या विकासामध्ये मेंढ्या सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजावत आहेत, परंतु हरनाली मेंढी तेव्हा तेथे नव्हती, त्यामुळे बरेच लोक या मेंढीशी परिचित नाहीत.  सध्या, ते हरियाणाच्या हिसारमध्ये आढळते, कारण ते येथील पर्यावरणासाठी योग्य आहे, परंतु आता हळूहळू ते स्वतःला इतर वातावरणाशीही जुळवून घेत आहे.

 पोषण आणि खाद्य व्यवस्थापन

कुठेतरी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की जर ही तीन वेगवेगळ्या मेंढ्यांपासून तयार केलेली मेंढी आहे तर त्यांचा आहारही वेगळा असेल, पण तसे अजिबात नाही. त्याला इतर मेंढ्यांसारखाच आहार दिला जातो. आहारात, त्यांना प्रामुख्याने मऊ गवत, कुरण, शेंगा, दाणे आणि झुडपे दिली जातात.

ह्या मेंढीपासुन किती लोकर मिळते

जसे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की ही मेंढी इतर मेंढ्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात लोकर देते. साधारणपणे, इतर भारतीय जातींच्या मेंढ्यापासुन 4 किलो लोकर मिळते, तर हरनाली मेंढीपासुन 6 किलो लोकर मिळते.

 रोगप्रतिकार क्षमता जास्त असते

साधारणपणे असे पाहिले जाते की मेंढीपालन करणारे शेतकरी मेंढ्यांच्या मृत्यूने त्रस्त असतात, पण इथे दिलासा देणारी गोष्ट आहे की हरनाली मेंढीची प्रतिकारशक्ती खूप मजबूत असते. ही जात रोगांशी चांगल्या पद्धतीने लढू शकते. ही मेंढी इतर मेंढ्यांपेक्षा जास्त काळ जगते. 

हरनाली मेंढी इतर मेंढ्यांच्या तुलनेत रोगांना कमी बळी पडतात, परंतु कधीकधी ह्या जाती पण  रोगांना बळी पडतात, परंतु उपचारानंतर ते बरे होतात म्हणजे मृत्यूदर कमी आहे ही एक दिलासा देणारी बाब आहे. या जातीचा शोध लागला तेव्हापासून ह्या जातीत असा कोणताही गंभीर आजार त्यात दिसला नाही. आरोग्याच्या दृष्टीकोनातून, इतर मेंढ्यांच्या तुलनेत ही जात खूप चांगली मानले जाते.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters