म्हैस पालन यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक असते. आपल्याकडे म्हशींचे संगोपन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. त्यासाठी जातीवंत म्हशींची निवड करणे गरजेचे असते. मशीन ची खरेदी करताना स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जातींची निवड, वय तसेच वेतांची संख्या व दूध देण्याची क्षमता इत्यादी बाबी फार महत्वाचे ठरतात. या लेखात आपण म्हशीच्याकाही उपयुक्त जाती बद्दल माहिती घेऊ.
म्हशींच्या काही उपयुक्त जाती
मुऱ्हाम्हैस
- या जातीच्या म्हशी रंगाने गडद काळा असून शिंगे डोक्यावर एकड्यासारखी गुंडाळलेली असतात.
- शरीराची बांधणीही भारदस्त आणि कणखर असते.
- भारतातील अधिक दूध देणारी जात असून दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असते.
- हि जात एका वेतामध्ये दुधाचे प्रमाण 3000 ते साडेतीन हजार लिटर इतके पर्यंत असते.
- या म्हशीचे मूळ स्थान हरियाणा राज्यातील मुख्यत्वे रोहतक आणि दिल्ली तसं उत्तर प्रदेशातील मिरत आहे.
- भारतात स्थानिक गावठी जातींच्या म्हशीची सुधारणा करण्यासाठी मुऱ्हा जातीच्या रेड्यांचाकृत्रिम रेतनासाठी वापर केला जातो.
- या जातीच्या रेड्यांची रेतनासाठी अधिक मागणी आहे.
जाफराबादी म्हैस
- गुजरात राज्यातील अमरेली,भावनगर,जामनगर,जुनागड, पोरबंदर आणि राजकोट येथे आढळते.
- या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने मोठे असतात.
- अंगावरील कातडी ढिलीआणिलोंबलेलीअसते.
- शिंगे मुळात जाड आणि चपटी,मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेले असतात.
- या जातीच्या म्हशी एका वेतामध्ये 1800 ते 2500 लिटर दूध देतात. दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण सहा ते सात टक्के असते.
नागपुरी म्हैस
- मध्य आणि दक्षिण भारतात एलीचपुरी किंवा नागपुरी जातीच्या म्हशी आढळतात. नागपूर, वर्धा आणि वऱ्हाड मधील इतर जिल्हे तसेच आंध्र प्रदेशातील काही भागात आढळते.
वैशिष्ट्ये
- रंग काळा, काहीवेळा तोंडावर पांढरे ठसे असतात.
- काही प्रकारात शिंगे मागे खांद्यापर्यंत असतात.
- दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते.
- सरासरी पाच ते सात लिटर प्रतिदिन दूध उत्पादन देते.
- एका वेतात हजार लिटर प्रति वेत दूध उत्पादन क्षमता असते.
Share your comments