गाय या आपल्या भारतीय संस्कृतीत माता समजली जाते.भारतामध्ये आपल्या गाईंचे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये दुग्धोत्पादनात वाढवावी यासाठी अनेक संकरित जातीच्या गायपालनाकडे शेतकरी वळले आहेत.परंतु आपल्या भारतीय गो वंशातल्या बऱ्याच जाती या विदेशी हायब्रीड जातींना टक्कर देतात. या लेखात आपण भारतीय गोवंशतल्या काही जातींची माहिती घेऊ.
भारतीय गोवंशातल्या गाई
- अमृत महल – या जातीच्या गायी या कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्याशी संबंधित आहेत.कर्नाटक मध्ये या जातीला बेन्ने चावडी या नावाने ओळखले जाते. या जातीचे बैल हे अतिशय मजबूत असून त्यांचा उपयोग शेती आणि जड कामासाठी केला जातो.
- गिर – या जातींचे मूळ उगमस्थान हे गुजरात राज्यातील गीर जंगलातील मानले जाते.ही गाय एका वेत काळात 3182 लिटर दूध देते. त्यामुळे इतर जातींपेक्ष ही जात सरस आहे.
- ओंगोले – हे काय वर्षाच्या 279 दिवसांमध्ये 600 ते 2518 किलो दूध देते. या गाईचे वजन तब्बल 432 ते 455 किलो असते. तसेच या गाईच्या दुधामध्ये फेटचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आसपास असते.. म्हणून या गायला आजही भरपूर प्रमाणात मागणी आहे.
- डांगी – या जातीचे मूळ हे मुंबई बाहेरील सांग नावाच्या गावांमध्ये असल्याचे मानले जाते. ह्या जातीच्या गाईंचा रंग हा काळा आणि पांढरा असतो.
- खिलारी- या गाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पश्चिम भारतामध्ये आढळते. जातींचे देखणे रूप पाहता या गायींना शेतकरी पांढरे सोने म्हणून संबोधतात. पण इतर गाईंच्या जातीच्या तुलनेत या जातीच्या गाईंचे दूध देण्याची क्षमता कमी असते.
- निमारी – या जातीची गाय ही मध्य प्रदेशातील खांडवा, इंदोर आणि बारवानी जिल्ह्यामध्ये आढळते. या गायीच्या ब्रीडीं साठी मध्य प्रदेश सरकारने एक ब्रिडींग फार्म सुरू केले आहे.
- थारपारकर – या गायीकमी खुराक असूनदेखील जास्त प्रमाणात दूध देतात. वाळवंटासारखा ठिकाणची परिस्थिती या गाईसाठी अनुकूल असते. या जातीच्या गाई वर्षाला 1800 ते 3500 लिटर दूध देतात.
- सिंधी- दुधाचा व्यवसाय जे लोक करतात त्यांच्यामध्ये ही गाय प्रसिद्ध आहे. या जाती मूळच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातीलअसून संपूर्ण जगभरात या गाई पाहायला मिळतात.
Share your comments