
modi buffalo
देशात अनेक पशु त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात, आणि अशा प्राण्यांना बघायला पशुप्रेमी मोठी गर्दी करतात. आज आपण अशाच एका रेड्याविषयी जाणून घेणार आहोत, या रेड्याची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे, आणि हा रेडा त्याच्या वजनामुळे प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नुकतेच हिमाचल प्रदेश मध्ये एका पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सोलन जिल्ह्यात पशुप्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात देशभरातून अनेक पशु प्रदर्शित केले गेले. यासाठी देशभरातील अनेक पशुप्रेमींनी हजेरी लावली होती. याच पशू प्रदर्शनात 21 कोटी चा रेडा देखील आला होता,अनेक पशुपालक याची तुलना सुलतान रेड्याशी करताना दिसत होते. मी आपणास सांगू इच्छितो की सुलतान हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी मरण पावला होता, या सुलतान ची किंमत तब्बल 21 करोड रुपये होती. सुलतान त्याच्या वजनामुळे तसेच त्याच्या विर्यामुळे जगात प्रसिद्ध होता.
का केली जाते या रेड्याची सुलतान रेड्यासोबत तुलना
या रेड्याचे तेलकट शरीर, चमकदार कातडी, आकर्षक डोळे पशुप्रेमीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी अनेक पशुप्रेमी देशभरातून जमा होतात.या रेड्याचे वीर्यातून रेड्याचे मालक दरवर्षी 90 लाख रुपयांची कमाई करतात. या रेड्याच्या विर्याला मार्केटमध्ये मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. या रेड्याचे नाव मोदी आहे,आणि या मोदी रेड्याच्या मालकाचे नाव वीरेंद्र सिंह असे आहे. वीरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मोदी रेड्याने सुलतान रेड्याला अनेकदा मात दिली आहे, म्हणुन या मोदी रेड्याची किंमत ही सुलतान रेड्यापेक्षा अधिक आहे. म्हणुन या रेड्याची किंमत 21 कोटी असल्याचे सांगितलं जात आहे.
मोदी रेड्याच्या विशेषता
मोदी रेडा हा विशेषता त्याच्या किंमतीमुळे व्हीआयपी रेडा बनला आहे. तसेच याचे वचन हे देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. हा रेडा पाच फूट नऊ इंच एवढा लांब आहे. या रेड्याचा खुराक हा इतर रेड्यांपेक्षा अधिक आहे, हा रेडा रोज वीस प्रकारचे चारा खातो. या रेड्यावर वार्षिक एक करोड रूपये पेक्षा अधिक पैसा खर्च केला जातो.
मोदी रेड्याचे मालक विरेंद्र सिंग यांच्या म्हणण्यानुसार या रेड्याचे वजन जवळपास पाचशे किलोच्या पुढे आहे. याचे वय फक्त सहा वर्षे एवढे आहे, पण हा एका मोठ्या हत्तीला देखील टक्कर देऊ शकतो असे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे. हा रेडा कोणत्याही पशू प्रदर्शनात गेला तर तेथील प्रमुख आकर्षण बनतो आणि सर्वांची मने जिंकून घेतो.
Share your comments