1. पशुधन

दुभत्या जनावरांसाठी समतोल आहाराची गरज ; 'या' पद्धतीने द्या आहार

अनेक शेतकरी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालनातून दूध,शेणखत मिळत असल्याने त्यातून पैसा ते पैसा मिळवत असतात. दुधाचा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अधिक चौकस राहावे लागते.

KJ Staff
KJ Staff


अनेक शेतकरी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालनातून दूध,शेणखत मिळत असल्याने त्यातून पैसा ते पैसा मिळवत असतात. दुधाचा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अधिक चौकस राहावे लागते. कारण दुधाळ जनावरांच्या आहार खूप महत्त्वाचा असतो, जर आहार कमी झाला तर दुधाच्या उत्पादनात घट होत असते. परिणामी आपल्याला नुकसान सहन करावे लागते. यासाठी  दुधाळ जनावरांना समतोल आहार देणे फार गरजेचे असते. समतोल आहारामध्ये चांगल्या दुग्धउत्पादनासाठी ओली वैरण, सुखी वैरण.

आंबोण यांचा वापर केला तर वाढत्या दूध ऊत्पादनासाठी अतिशय मह्त्वाचे असते. हिरवी वैरण देताना एकदल व द्विदल चाराचे योग्य प्रमाणात मिश्रण करणे फार आवश्यक असते.   एकदल वर्गामध्ये मका, बाजरी, ज्वारी, इत्यादींचा समावेश असतो. एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते पण पिस्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे जनावरांना फार उपयुक असते. द्विदल चाऱ्यामध्ये चवळी, इत्यादी चाऱ्यांचा समावेश असतो. द्विदल वर्गीय चाऱ्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते म्हणुन द्विदल वर्गीय चाऱ्यांचा आहारात समावेश करावा.

  • सुका चारा, गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा भाताचा पेंडा आहारात द्यावा. या चाऱ्यांचा उपयोग असा होतो की जनावरांना पोटभर वैरण मिळते, तुलनेने हे वैरण कमी पौष्टिक आहे पण जनावरांना उपयोगी आहे.
  • आंबोण = आंबोणामध्ये प्रथिने व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात. आंबोणामध्ये मक्का, ज्वारी, बाजरी हे तृणधान्य वापरावीत. सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल इत्यादी पिकांची पेंड वापरावी जेणेकरून प्रथिनांचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो.  त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होऊन जनावरांचे आरोग्य उत्तम राहते.   
  • पशुखाद्यामध्ये २५ ते ३० टक्के पेंड,  २० ते ४५ टक्के तृणधान्य, २० ते ३० टक्के  कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ १ ते २ टक्के खनिज मिश्रणाचा उपयोग करतात.

पशुखाद्य देण्याचे प्रमाण हे दुग्धोत्पादनावर अवलंबून असते.  १ ते ५ किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी द्यावे,  त्याच्यामुळे जनावरांचे आरोग्य व पोषण चांगल्या प्रकारे होते.  तसेच १ किलो आंबोण प्रति अडीच लिटर दुग्ध उत्पादनासाठी द्यावे. आंबोण देण्याआधी ते १० ते १२ तास भिजवून ठेवावे. भिजवल्यामुळे खातांना जनावरांना ते  रुचकर लागते.  आंबोणमुळे जनावरांमधील पाचकता वाढीस लागते. आंबोण हा घटक खर्चिक असल्यामुळे त्याच्यावरील खर्च कमी करून  दुग्धव्यवसाय किफायतशीर बनवावा. १० लिटर दूध देणाऱ्या गाईस १५ ते २० द्विदल हिरवा चारा, २ ते ३ मक्का भरडा द्यावा, त्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ होते.  दूध काढतेवेळी आंबोण द्यावे. दूध काढल्याबरोबर कडबा सुखा चारा इत्यादी द्यावे.

English Summary: The need for a balanced diet for dairy animals, feed in this way Published on: 13 July 2020, 12:55 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters