1. पशुसंवर्धन

शेळ्यांमधील सर्वाधिक घातक आजार; संसर्गित गर्भपाताची जाणून घ्या ! कारणे अन् उपाय

KJ Staff
KJ Staff


शेळीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे. कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत चांगल्या आर्थिक उत्पन्नाची निश्चित हमी असणारा हा व्यवसाय आहे. तसेच व्यवसायामध्ये काही समस्या आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना होणारे आजार. शेळ्यांना विविध प्रकारचे आजार होतात, त्याचे निराकरणही करण्यात येते. तसेच काही आजारांच्या बाबतीत लसीकरण करतात.  परंतु काही आजार जास्त घातक असतात.  आज या लेखात आपण अशाच एक घातक आजाराविषयी माहिती घेणार आहोत. त्या आजाराचे नाव आहे सांसर्गिक गर्भपात(ब्रुसेलोसिस ).

  काय आहे सांसर्गिक गर्भपात(ब्रुसेलोसिस ) आजार

हा आजार प्रामुख्याने ब्रुसेला ओविस या प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. या आजारांचे संक्रमण जर नरांमध्ये झाले इतर नरांना वंधत्व निर्माण होऊ शकते. या आजाराचे सगळ्यात घातक वैशिष्ट्य म्हणजे,  हा आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे. जगामधील बऱ्याच देशांमध्ये हा आजार आढळतो.  आपल्या भारतातही प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा आजार आढळतो.  हा आजार शेळ्यांमध्ये झाला तर गाभण शेळ्यांचा साडेतीन महिने ते ४  महिन्याच्या काळातच गर्भपात होतो.  एखाद्या शेळीला कळपामध्ये हा आजार झालेला असेल तर त्या शेळीचा पडलेला जार, गर्भ भोवतालचे चिकट पाणी, लघवी, दूध, वीर्य अशा अनेक माध्यमातून हा आजार कळपात पसरतो. त्यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते.

 या आजारापासून वाचण्यासाठी करावयाचे उपाय

 हा आजार वर्षानुवर्षे कळपामध्ये राहतो. या आजाराचा जिवाणू असल्याने  तो अनेक मार्गांनी एकापासून दुसऱ्याकडे संक्रमित होत असतो. जसे की, कळपामध्ये वापरलेली खाद्याची भांडी,  कपडे, कळपामध्ये काम करणारे मजूर या अशा इतर माध्यमांद्वारे हा जिवाणू पसरत असतो. म्हणून यापासून वाचण्यासाठी गोठ्याची स्वच्छता जबाबदारी ठेवणे महत्त्वाचे असते.  दुसरे म्हणजे आपण जेव्हा बाजारातून शेळ्या विकत आणतो तेव्हा त्या शेळ्यांची खरेदी करताना त्या शेळ्यांचा मागील इतिहास जसे की त्यांना काही आजार वगैरे नाही ना त्याची खात्री करून घ्यावी. खरे पाहायला गेले तर, या आजारावर कुठल्याही प्रकारचा प्रभावी उपचार नाही. केवळ लक्षणांच्या आधारावर उपचार करावा लागतो, परंतु त्याने आजार पूर्ण बरा होईल याची शाश्वती नसते.

दरम्यान असलेल्या उपचारांचा खर्चही अफाट असतो. या आजारातून जनावर बरे झाले तरी त्यांच्या प्रजनन क्षमतेवर याचा खोलवर परिणाम होत असतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या शेळ्या वारंवार गाभडतात अशा शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात. प्रजननासाठी ठेवलेल्या नराची प्रजनन सुरू करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या आजाराचे निदान हे गर्भपात झालेल्या वेळेस पडलेला गर्भ किंवा पडलेल्या जाराची तुकडे यावरून करता येते. शेळ्यांमधून माणसांमध्ये हा आजार विविध माध्यमातून संक्रमित होऊ शकतो. जसे की, कच्चे मांस सेवन करणे, प्राण्यांच्या संपर्कात येणारी माणसे, पशुवैद्यक त्यांना सहजपणे ह्या आजाराची संक्रमण होऊ शकतात. त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे शेळ्यांचा जार उघड्या हातांनी काढणे टाळावे.  पूर्ण संरक्षित साधनांचा वापर करावा. खाद्याचे, पाण्याचे भांडे धुऊन स्वच्छ करावीत. जमिनीचे वर्षाचे जमिनीचे व शेडचे निर्जंतुकीकरण करावे. गाभडलेला गर्भ खोल खड्डा करुन पुरुन द्यावा.

 


या आजाराची साधारण लक्षणे

या आजाराने संक्रमित झालेल्या शेळीची कास नेहमी सुजलेली दिसते किंवा वारंवार सुजते. संक्रमित झालेल्या शेळ्या अचानकपणे लंगडू लागतात.  आजार झाल्यास शेळ्यांच्या व्ययाच्या वेळी जार अडकत असते. नरांमध्ये टेस्टीस सुजलेल्या दिसतात तसेच गुडघ्यांमध्ये सूज जाणवते.वरीलपैकी काळजी घेऊन शेळी पालकांनी शेळ्यांची काळजी घ्यावी. होणारे आर्थिक नुकसान पासून स्वतःचा बचाव करावा.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters